Home बुलडाणा समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम संपन्न..!

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम संपन्न..!

148

 

देऊळगाव मही येथे पशुखाद्य प्रक्रियाबाबत शेतकऱ्यांसमोर प्रात्याक्षिक व मार्गदर्शन..

आदिल खान
देऊळगाव मही/  येथे समर्थ कृषी महाविद्यालयातील कृषी दूतांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कर्यक्रम घेण्यात आला,यामध्ये शेतकऱ्यांसमोर प्रात्याक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले.पशुखाद्यावर प्रक्रिया केल्यामुळे खाद्याची चव वाढते त्यामुळे जनावर उष्टाल टाकत नाही आणि खाद्य वाया जात नाही.दुधजन्य प्राण्यांना दररोज वेळेवर योग्य प्रमाणात खाद्य दिल्यावर दुधात वाढ होते ही प्रक्रिया कमी खर्चिक व सोपी आहे तसेच पशुखाद्य प्रक्रिया कशी करावी जसे की १०० किलो पशुखाद्य प्रक्रियासाठी २ किलो युरिया,२ किलो मीठ, 10 किलो उसाची मळी किंव्हा गूळ ,१ किलो खनिज द्रव्ये 40 लिटर पाणी तसेच सुक्या कडब्याचे कुटार किंवा भुस /गव्हांडा घ्यावे. 40 लिटर पाण्यात २किलो मीठ, २ किलो युरिया, त १०किलो उसाची मळी किव्हा गूळ ,१किलो खनिज द्रव्ये मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे .नंतर कुटार किंवा गव्हांडा एकसमान ताडपत्रीवर पसरवून घ्यावे आणि नंतर स्प्रेयर किंवा ओंजळीने मिश्रण भुसावर पसरावे त्यानंतर २८ दिवस हवाबंद ताडपत्रीत झाकावा.आणि नंतर पशु खाद्य म्हणून वापर करावा हे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.महत्वाचं सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे,रावे समन्वयक प्राध्यापक मोहनजीतसिंग राजपूत, पशुसंवर्धन आणि दूध शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक श्वेता धांडे यांचे मार्गदर्शन लाभले,या वेळी कृषी दूत नितीन शिंगणे, रोहन शिंगणे, योगेश शिंगणे यांनी शेतकऱ्यांना उदाहरणासह सोप्या पद्धरीने प्रात्याक्षिक सदर करत मार्गदर्शन केले. .