Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विनयभंग व खंडणी प्रकरणात पारवा पोलीस घाटंजी न्यायालयात...

घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विनयभंग व खंडणी प्रकरणात पारवा पोलीस घाटंजी न्यायालयात ब वर्ग समरी दाखल करणार..?

423

◼️तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांच्या तपासानुसार घटना घडलीच नसल्याचा निष्कर्ष..?

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुर्ली येथील पिडीत सहाय्यक शिक्षिकेच्या तक्रारीवरुन पारवा पोलीसांनी कुर्लीचे सरपंच सतीष लचमारेड्डी गड्डमवार, माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, सहाय्यक शिक्षक किसन किणाके व शिक्षक नितीन मुद्देलवार यांचे विरुद्ध 12 जुलै रोजी अपराध क्रंमाक ०३५६ भादंवि कलम ३८४ (खंडणी मांडणे), ३५४ (अ) (शरीर सुखाची मागणी करणे), १४३, १४९, ५०४ व ५०६ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. सदरचे प्रकरण गंभीर असल्याने पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरख चौधर हे स्वतः तपास सुरू केला आहे.

मात्र, सदर घटना घडलीच नसल्याचा निष्कर्ष पारवा पोलीसांनी काढला असून सदर गंभीर प्रकरणात घाटंजी येथील न्यायालयात ब वर्ग समरी फायनल पाठविण्यात येणार असल्याचे सुचनापत्र पिडीत महीलेला 29 जुलै रोजी प्राप्त झाले आहे, हे विशेष.

दरम्यान, फिर्यादी पिडीत सहाय्यक शिक्षिकेने आपण दिलेल्या बयाणानुसार पारवा पोलीसांनी आपले बयाण नोंदविलेले नाही. त्यामुळे पिडीत महीलेने कुर्ली येथील विनयभंग व खंडणी प्रकरणातील संशयित आरोपीविरुद्ध 17 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना रजिष्टर पोष्टाने व नंतर 19 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून विनयभंग व खंडणी प्रकरणातील संपूर्ण आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती.

सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या आदेशावरून अपर पोलीस अधीक्षक डाँ. खंडेराव धरणे यांनी 10 आँगस्ट रोजी पिडीत महीला शिक्षिकेचे बयाण पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदविलेले असून पारवा पोलीसांनी आपण सांगीतल्या प्रमाणे बयाण नोदंविले नसल्याचा आरोप करुन संबधित तपास अधिकारी हे आरोपींना मदत करत आहे तसेच आरोपींना वाचवित असल्याचे बयाण नोंदविले. त्या नंतर 11 आँगस्ट रोजी सीआरपीसी कलम 164 अंतर्गत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या समक्ष घाटंजी न्यायालयात बयाण नोंदविण्यात आले.
न्यायालयातील बयाण सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी नुसार नोंदविल्याचे खात्रीलायक रित्या समजते. मात्र, पारवा पोलीसांनी सदरचा गुन्हा अजामीनपात्र असतांना सुद्धा संबधित संशयित आरोपींना अटक केलेली नव्हती, हे येथे उल्लेखनीय.

पारवा पोलीस स्टेशन मध्ये दाखल तक्रारीनुसार, पिडीत सहाय्यक शिक्षिका ही १२ जुलै रोजी दुपारी कुर्ली येथील केन्द्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत, शाळेत विद्यार्थी नसल्याने मुख्याध्यापक कार्यालयात एकटी बसून होती. त्याच वेळी कुर्लीचे सरपंच सतीष गड्डमवार, माजी सरपंच विलास बडगुलवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, सहाय्यक शिक्षक किसन किणाके व शिक्षक नितीन मुद्देलवार हे पांचही जन कार्यालयात येऊन सहाय्यक पिडीत शिक्षिकेला शरीर सुखाची मागणी केली. तसेच तुम्ही शाळेचे पैसे खाल्याने तुमच्या विरोधात आम्ही पंचायत समितीला तक्रार केली आहे. सदर प्रकरण बंद करायचे असेल तर आम्हाला दिड लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी पिडीत सहाय्यक शिक्षिकेला सरपंच व माजी सरपंच यांनी दिल्याचे अपर पोलीस अधीक्षक व घाटंजी न्यायालयात दिलेल्या बयाणात सांगीतले असून, संबधित पिडीत महीलेला सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर व किसन किणाके यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचे बयाण सुद्धा नोंदविल्याचे वृत्त आहे. या बाबतची तक्रार पिडीत सहाय्यक शिक्षिकेने १२ जुलै रोजी पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावरुन पारवा पोलीसांनी पांचही आरोपी विरूध्द भादंवि कलम – ३८४, ३५४ (अ), १४३, १४९, ५०४ व ५०६ अन्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते.

सहाय्यक शिक्षिका माधुरी ईथापे निलंबित..!

कुर्ली येथील सहाय्यक शिक्षिका कु. माधुरी प्रभाकरराव ईथापे हिला कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत शासकीय रकमेचा अपहार व अनियमितता करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना करणे, शाळा व्यवस्थापन समितीची सभा न घेणे आदीं कारणा वरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीधर पांचाळ यांनी निलंबित केले असून तसा आदेश घाटंजी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी दिपीका गुल्हाने यांनी बजावला आहे. ईथापे यांना निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पंचायत समिती उमरखेड येथे देण्यात आले आहे.