शरीफ शेख
रावेर , दि. २३ :- जळगाव मुस्लिम मंच आयोजित साखळी उपोषणाचा एकोणतिसावा दिवस नरभक्षक राष्ट्रीय महामार्ग यांच्या विरोधात व मन्यार बिरादरीचे जे २ तरुण अपघातात ठार झाले त्यांच्या आत्म्यला शांति साठि भारतीय नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यात आला.
उपोषण ठिकाणी सन्नाटा
उपोषणाच्या सुरुवातीलाच अत्यंत शोकमग्न अशा परिस्थितीत उपोषणाची सुरवात हाफिज रहीम यांच्या पवित्र कुराण पठाणाने करण्यात आली मन्यार बिरादरीचे अध्यक्ष तथा जळगाव मुस्लिम मंच समन्वयक फारुक शेख यांनी बुधवारी राष्ट्रीय महामार्ग एरंडोल येथे झालेल्या एका रस्ते अपघातात मन्यार बिरादरीचे दोन सख्खे भाऊ अल्ताफ मणियार वय ३४ वर्ष व इक्बाल मन्यार वय ३० वर्ष यांचा अपघाती मृत्यू झाल्याने प्रथम त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मुफ़्ती हारून नदवी यांनी दुवा करताना नैसर्गिक रित्या त्यांच्या डोळ्यात अश्रूंनी वाट करून दिली तेव्हा समस्त उपोषण मंडपात मंडपातील तरुणाईने सुद्धा आपल्या अश्रूंना वाट करून दिली मुफ़्ती हारून नदवी यांनी अल्लाह- ईश्वराकडे प्रार्थना केली की अशा प्रकारचे मृत्यू या महामार्गावर होता कामा नये व हे महामार्ग नरभक्षक असले तरी त्याच्यातून आम्हा सर्व मानव जातीची सुटका कर अशी प्रार्थना केली.
शिरसोली व शहरातील तरुणाईच्या संयुक्त विद्यमाने उपोषण
शिरसोली ग्रामपंचायतचे शिवसेना सदस्य अकील मणियार यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली शिरसोली चे सरपंच प्रदीप रावसाहेब पाटील, ज्येष्ठ पत्रकार भगवान सोनार, यांच्यासह शहरातील ज्येष्ठ कवी रागिब यावली, सय्यद चाँद, इक्बाल शेख, सत्तार शेख, रफिक करीम,मोहसिन फारूकी, शरीफ शाह,शेख हसन, आसिफ शेख, रफिक शेख, असलम अजीज, युसुफ मजिद, रफिक शेख, आदींची उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांना अकील शेख यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.