यवतमाळ / घाटंजी – “राष्ट्रीय स्तरावरील ओबीसीचे नेते व वक्ते यांना एकत्र निमंत्रित करून ओबीसी च्या प्रश्नावर दिल्लीत ओबीसी सत्याग्रह परिषदेचे आयोजन करणार.”
सर्वत्र ओबीसी समाज बांधवांना या द्वारे कळविण्यात येते की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही ओबीसी समाज सर्वांगीण विकासापासून वंचित आहे. देशात ओबीसी समाज 52 टक्केच्या वर असूनही, ओबीसी च्या कल्याणाकरिता केंद्राच्या व राज्याच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद झाली नाही. यामुळे समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, व राजकीय विकासापासून वंचित आहे. सर्वत्र ओबीसी घटकाला जर हक्क,अधिकार व न्याय वाटा मिळवून द्यावयाचा असेल तर, ओबीसीची जातिनिहाय 2021 ची राष्ट्रीय जनगणना ही काळाची गरज आहे.
याच अनुषंगाने ओबीसीच्या हक्क व अधिकार यासाठी ज्या सामाजिक संस्था व राजकीय संघटना, व्यक्ती प्रयत्न करीत आहे. या सर्वत्र संस्था-संघटना चे पदाधिकारी, नेते व वक्ते यांना एकत्र निमंत्रित करून जसे- मा.छगन भुजबळ, मा. बाळासाहेब आंबेडकर, मा.नाना पटोले, मा.प्रकाश पोहरे, मा.प्रा.श्रावण देवरे, मा.प्रा.हरी नरके, मा.लक्ष्मण तायडे, मा.बाळूभाऊ धानोरकर, मा.विजय वडेट्टीवार, मा.हंसराज अहिर, मा.संजय राठोड, मा.हरिभाऊ राठोड, मा.राजेन्द्र महाडोळे, मा.ज्ञानेश्वर गोरे, मा.विलास काळे, मा.प्रदीप वादाफळे, मा.आत्माराम जाधव, मा.प्रवीण पेटकर, अशा अनेक नेते व वक्ते यांना प्रत्यक्ष भेटून, राष्ट्रीय लढा उभा करण्याचा संकल्प आधार बहुउद्देशीय कृषी व ग्रामीण विकास संस्था जि. यवतमाळ यांनी नुकतीच संस्थेच्या संपर्क कार्यालयात सभा आयोजित केली होती. या सभेत राष्ट्रीय ओबीसी जागरण अभियान अंतर्गत, दिनांक 21 व 22 नोव्हेंबर 2021 ला दिल्ली येथे रामलीला मैदानावर “ओबीसी सत्याग्रह परिषद” आयोजित केली आहे.
या परिषदेमध्ये 2021 सालच्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जातिनिहाय जनगणना करण्यात यावीे. व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी चे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे. याबाबतचे ठराव पारित करून माननीय पंतप्रधान साहेब, व माननीय राष्ट्रपती महोदय, मा.सामाजिक न्याय मंत्री यांना सादर करण्यासाठी सदर परिषदेमध्ये मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत असून ओबीसीच्या सर्वांगिन प्रश्नांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात येत आहे. तरी सर्वत्र ओबीसी समाज बांधवांनी अभियान यशस्वी करण्यासाठी तन-मन-धनाने सहकार्य करावे. अशी माहिती “राष्ट्रीय ओबीसी जागरण अभियान” चे मुख्य संयोजक तथा संस्था अध्यक्ष *पांडुरंग निकोडे* यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.