तालुकाध्यक्ष पदी बबलू मुल्ला तर सचिव पदी संदिप पिल्लेवाड
मुखेड
पत्रकार संरक्षण समिती शाखा तालुका मुखेडची दि ५ सप्टेंबर रोजी शासकीय विश्राम ग्रहात नुतून कार्यकरणी घोषीत करण्यात आली.यावेळी पत्रकार सरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा सचिव शशिकांत गाढे पाटील आणि मुखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मुखेड तालुका पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्ष पदी बबलू मुल्ला, तर सचिव पदी संदिप पिल्लेवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समजातील राजकीय, सामाजिक आणि सर्व घटकास न्याय मिळवून देण्यासाठी समजात अहोरात्र झटत असतात आणि सर्वसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करतात हे काम करत असताना पत्रकारांना अनेक अडी अडचणींना सामोरे जावे लागते त्यासाठी पत्रकारांना पाठबळ मिळावे म्हणून पत्रकार संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्ष बबलू मुल्ला, सचिव पदी संदिप पिल्लेवाड, कार्याध्यक्ष मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष पवन जगडमवार, सल्लागार पदी अनिल कांबळे, रियाज शेख, रामदास पाटील, जयभीम सोंनकांबळे, सहसचिव पदी मुस्तफा पिंजारी आणि सदस्य गंगाधर सोंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून नुतून कार्यकरणीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.