फाशी ऐवजी मरे पर्यंत जन्मठेपेची शिक्षा ,
अमीन शाह
बुलडाणा ,
नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. फाशीऐवजी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी या आरोपींना बुलडाणा सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा नागपूर खंडपीठाने कमी केली.
काय आहे ,
काय होते प्रकरण ,
सागर विश्वनाथ बोरकर आणि निखिल शिवाजी गोलाईन अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत दोन वर्षांपूर्वी ही बलात्काराची घटना घडली होती.
नेमकं काय घडलं?
26 एप्रिल 2019 रोजी रात्री 10 वाजता पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह घरी झोपली होती. त्यावेळी आरोपींनी मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होतं त्या नंतर या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी सागर बोरकर व निखिल गोलाईत यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती सम्पूर्ण देशात ह्या खटल्याची फार चर्चा ही झाली होती ,
फाशीची शिक्षा रद्द करुन जन्मठेप
या प्रकरणात बुलडाणा सत्र न्यायालयाने या दोघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा रद्द ठरवली. त्याऐवजी आता या आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्णय न्या , विनय देशपांडे , न्या , अमित बोरकर यांनी दिला या प्रकरणी सरकार तर्फे अँड , संजय डोईफोडे यांनी तर आरोपी तर्फे अँड , राजेंद्र डागा , अँड , ऐ , ऐ , धवस यांनी बाजू मांडली ,