16 लाखांचा मुद्देमाल जप्त ,
अमीन शाह
बुलडाणा ,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि . 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी संग्रामपूर तालुक्यातील काही लोक ग्राम वसाडी , निमखेडी , टुनकी व सोनाळा या ठिकाणी विना कागदपत्रे दुचाकी वाहने विक्री करत होते . यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण माहितीच्या आधारे सुनिल भाऊसिंग मुजाल्दा व राकेश गुलसिंग जामरा या दोघांवर पाळत ठेवली व त्यांना ताब्यात घेतले . हे दोघेही ग्रामीण भागात मध्यप्रदेशातील दोन इसमांच्या संपर्कातील मोटार सायकली घेवून त्या ग्रामीण भागात कमी किंमतीत विक्री करुन कमीशनवर काम करत होते . पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती त्यांनी वसाडी , निमखेडी , टुनकी व सोनाळा या भागात तब्बल 21 मोटार सायकली व टॅक्टर विक्री केल्याची माहिती समोर आली . या सर्व मोटार सायकली पोलिस पथकाने जप्त केले आहेत . परिवहन विभागाकडे या जप्त दुचाकींची तपासणी केली असता त्या महाराष्ट्रातील बिड , नंदुरबार या जिल्हयासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले . तसेच 6 मोटार सायकलींचा परिवहन विभागाकडून कुठलाही माहिती मिळू शकली नाही . पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळील 21 मोटर सायकली व एक टॅक्टर असा एकूण 16 लक्ष रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे . या दोघांनवर दि .7 सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा सोनाळा पोलिस स्टेशन अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सोनाळा पोलिस करीत आहे . सदर कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके , श्रीकांत जींदमवार , संजय नागवे , दिनेश बकाले , गणेश पाटील , गजानन गोरले , सुरेश भिसे व सचिन जाधव यांच्या पथकाने यशस्वी केली आहे .