Home नांदेड मुख्याध्यापक जोशी यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.

मुख्याध्यापक जोशी यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.

165

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट,दि : ८:- के.प्रा.शा.चिखली खु. चे मुख्याध्यापक श्री राजेश्वर जोशी यांच्यावर स्थानिक व्यक्तीने शिवीगाळ करून त्यांना झापड मारली त्याबद्दल संबधीतावर गुन्हा नोंद झाला आहे तरी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांना देण्यात आले या प्रसंगी संघटनेचे जिल्हा नेते ग.नु.जाधव, तालुकाध्यक्ष राजकुमार बाविस्कर व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते , किनवट तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून राज्यात परिचित आहे अशाने इथे अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्य बाजावण्यास धजवतात त्यात अशा समाजकंटक तत्वामुळे येथील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, कायदेशीर सेवा मिळण्यास अडसर निर्माण होते . तालुक्यात विविध संघटनांचे लेटरपॅड छापून भ्रष्ट कृत्य करण्याचा उच्छाद माजवला जात आहे अशा तत्वांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करणे हे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे.