Home मराठवाडा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयास तातडीने न्याय देवू- मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष सिंग...

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयास तातडीने न्याय देवू- मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष सिंग आणि पालकमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन

123

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

……… ‌‌………..‌‌………….‌‌……..
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव आशिष सिंग आणि मनोज जरांगे पाटिल यांच्यासह बलिदान दिलेले कुटुंबिय चर्चा दरम्यान उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या मागणीसाठी आज सरकारकडे सर्व कागदपत्रे देण्यात आले.बलिदान देणार्‍या कुटुंबाचे वारसदार यांचे नावे,बँक खाते क्रमांक देण्यात आले असून आता फक्त वारसदारांचा वारसाचा देणे बाकी आहे.तो देवून लगेच शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येतील असेही सविस्तर चर्चा करण्यात आली.

एक ते दीड तास मराठा आरक्षणासाठी बलिदान देणार्‍या कुटुंबाच्या मागणी विषयी मुख्यमंत्री यांचे सचिव आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली असून महामंडळाऐवजी दुसऱ्या शासकीय विभागात शासकीय नोकरी या ४५ बलिदान देणार्‍या कुटुंबाच्या सदस्यांना देण्यात यावी,अशी आग्रहाची मागणी मनोज जरांगे पाटिल यांनी लावून धरली आणि या मागणीला सकारात्मक प्रतिसाद राजेश टोपे आणि मुख्यमंत्री साहेबांचे मुख्य सचिव यांनी दिला आहे.

आठ दहा दिवसांच्या आत सर्व कुटुंबियांना न्याय मिळेल,असेही मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितले आहे.यावेळी उपस्थित श्रीराम कुरणकर,संतोष गुजर पाटिल,रवी चौधरी,चंद्रकांत बेदरे,भगवान सोनवणे हे चर्चा वेळी हजर होते.