मजहर शेख, नांदेड
नांदेड/माहूर,दि : १० :- गणेशोत्सव निमित्य कोवीडचे सर्व नियम पाळून तसेच शासनाकडून ऑनलाईन परवानगी घेऊन श्रीं ची स्थापना करावी असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहेत. तसेच लाॅउडस्पिकर व मिरवणूक यावर प्रतिबंध असून चार फूटा पेक्षा जास्त उंचीची मुर्ती असू नये तसेच आरती साठी छोट्या स्पीकर बॉक्सचा उपयोग करावा, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे शासनाचे निर्देश आहेत असे सांगीतले आहे.
यावेळी पोलीस प्रशाषणाकडून उत्सवानिमित्य सहकार्याची भुमिका राहील तसेच गावकऱ्यांनी सुद्धा गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, उत्सवादरम्यान कोणताही अनुचितप्रकार घडणार नाही यासाठी तगडा बंदोबस्त राहील असे सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सांगितले आहे.