यवतमाळ – अमृत योजनेच्या नावाखाली जीवन प्राधिकरणच्या भ्रष्ट कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आडके कंपनी, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,
सदर कंपनीला काळया यादीत समाविष्ट करा या प्रमुख मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक चर्च रोड येथील जीवन प्राधिकरणाच्या 20 फुट खोल खड्ड्यात ज्या ठिकाणी नुकताच एकाव्यक्ती चा जीव गमावला त्या खडय्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष आणि हमदापुरे यांच्या नेतृत्वात मनसेचे हे आंदोलन करण्यात आले जवळपास दीड तास दहा फूट खोल पाण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरण या विरोधात प्रचंड नारेबाजी करत आपला रोष व्यक्त केला सोबतच आडके कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यासह अमृत योजनेच्या भ्रष्टाचारावर प्रचंड नारेबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी जोपर्यंत आडके कंपनी नाशिक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि आडके कंपनीला ला काळया यादीत समाविष्ट करत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरु ठेवण्याचा गर्भित इशारा याप्रसंगी कार्यकारी अभियंता व्यवहारे व इतर जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिला. या ठिकाणी मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे काही काळ तनाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती वेळप्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप करत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्याच्या अनुषंगाने मध्यस्थी करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा घडून आणली ,परंतु याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाशिवरामवार आणि अनिल हमदापुरे यांनी आमच्याशी चर्चा करायची असेल तर पाण्यामध्ये उतरुन खड्ड्यात आमच्या सोबत बसून चर्चा करा अन्यथा हे मनसेचे आंदोलन असाच सुरू राहील अशी भूमिका घेताच शेवटी मनसेच्या आक्रमक पवित्र्या पुढे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नांगी टाकत मनसेच्या शिष्टमंडळासोबत खड्ड्यांमध्ये पाण्यात उतरून चर्चा केली .याप्रसंगी संबंधित आडके कंपनीवर काळया यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव अमरावती अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरण यांना पाठवण्या संदर्भाचं लेखी पत्र सोबतच शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ची कार्यवाही पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले या चर्चेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात ठोस पावले न उचलल्यास कार्यकारी अभियंता व्यवहारे यांच्या दालनामध्ये मनसेच्या पद्धतीने आंदोलनाला समोर जावे लागेल असा गर्भित इशारा जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिला मनसेच्या या आंदोलनात प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार मनविसे जिल्हाध्यक्ष आणि हमदापुरे, शहराध्यक्ष एडवोकेट अमित बदनोरे, अब्दुल साजिद, विकास पवार विनोद दोदल, सुमित झाडे, पिंटू पिंपळकर, विलास बट्टावार, संदीप भिसे, मयुर मेश्राम , सादिक शेख , सचिन येलगंधेवार , कपिल ठाकरेयासह अनेक मनसेचेसादिक शेख सचिन येलगंधेवार कपिल ठाकरे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.