Home महत्वाची बातमी कर्जपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने केली आत्महत्या

कर्जपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने केली आत्महत्या

146

दुःखद घटना

अमिन शहा

बुलडाणा , दि. २३ :- बँकेचे व फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याने चिंचोल येथील शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कंबरेच्या करदोळ्याच्या साहाय्याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज घडली.
चिंचोल ता.मलकापूर येथील अशोक तुळशीराम लोड (पाटील) वय ५२ यांचेकडे साडेतीन एकर शेती असून त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये या शेतीकरिता विदर्भ कोकन बँकेकडून १.५० लाख, महेंद्र फायनान्सकडून १.५० लाख असे ३ लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र सततची नापिकी व पिकपाणी नसल्याने ते कर्ज फेडू शकले नव्हते. याच विवंचनेत २३ जानेवारीच्या सकाळी त्यांनी आपल्या शेतामध्ये जावून आपली जीवनयात्रा संपविली.
या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, राकाँनेते संतोषराव रायपुरे, सरपंच बाळूभाऊ पाटील आदींनी याठिकाणी भेट दिली. तर आ.राजेश एकडे यांनी सुध्दा याबाबत कुटुंबियाशी व उपस्थितांशी चर्चा करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
मृतक अशोक लोड यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा आप्त परिवार आहे. याबाबत पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.