नांदेड प्रतिनिधी/ संतोष अशोक भद्रे
नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मोटीसिंग जागीरदार तर शहरअध्यक्ष अब्दुल शफि यांची निवड करण्यात आली आहे.
नांदेड शहरातील विकासाचे काम तसेच समाजातील अडीअडचणी व कोरोणा महामारी च्या काळात
सर्वसामान्य जनतेचे पक्षाच्यावतीने केलेल्या कामाचा आढावा लक्षात घेता त्यांच्या कामगिरीबद्दल नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मोटीसिंग जागीरदार तर शहराध्यक्ष अब्दुल शफी यांना निवडण्यात आले आहे.व उत्कृष्ट काम केल्याबद्दल महेश ठाकूर, शक्ती परमार, अनिकेत परदेशी, संघरत्न जाधव यांना पक्षाच्या राजमुद्रा लावून सन्मानित करण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील पदाधिकारी तसेच शहरातील काही कार्यकर्ते उपस्थित होते.