साहब,वारंट है क्या???
कायद्यातील काही तरतुदींची सविस्तर माहीती
वाशिम(फुलचंद भगत):-शुटआऊट ॲट वडाळा या चीत्रपटामध्ये मनोज वाजपेई त्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलीसांना म्हणतो “वारंट लाया है”. हे वाक्य आपण हिंदि सिनेमा मध्ये नेहमीच ऐकतो.
हिंदि सिनेमामुळे कायद्याबाबत काहि चुकीच्या संकल्पना रूजविल्या आहेत. हत्या कींवा ईतर कोणता गून्हा केल्यानंतर सीनेमातील वीलेन हा अटक करण्या करीता आलेले पोलीस अधिकारी यांना असे विचारतांना दिसतो. परंतु हे चुकीचे आहे.
Code Of Criminal Procedure, 1973 म्हणजेच फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३ च्या कलम ४१ मध्ये पोलीस वारंटशिवाय कधी अटक करू शकतात हे सांगितले आहे. कलम ४१ च्या सहकलम १ नूसार पोलीस अधिकारी माननीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय किंवा वारंटशिवाय कोणत्याहि व्यक्तीला अटक करू शकतात जर त्या व्यक्तीने पोलीसांसमोर दखलपात्र गून्हा केला असेल कींवा त्या व्यक्ती विरूद्ध वाजवी तक्रार, विश्वासार्ह माहिती किंवा वाजवी संशय आहे की त्या व्यक्तीने ७ वर्ष कींवा ७ वर्षापर्यंत शिक्षा असलेला दखलपात्र गून्हा केला आहे. परंतु तसेकरण्याकरीता पोलीसांना खात्री करावी लागते की अटक करणे आवश्यक आहे त्या व्यक्तीला परत काही गून्हा करण्यापासून रोखण्यासाठी कींवा सखोल तपासासठी कींवा पूरावा नष्ट करण्यापासून रोखण्यासाठी कींवा साक्षीदारांना धमकी वा आमिष देण्यापासून रोखण्यासाठी कींवा अटक केल्याशिवाय त्याचे माननीय न्यायालयासमोर presence secure म्हणजेच ऊपस्तीथी सुरक्षीत करता येत नाही.सहकलम २ नुसार जर कोणत्याहि व्यक्ती विरूद्ध वाजवी तक्रार आहे की त्या व्यक्तीने ७ वर्षापेक्षाजास्त शिक्षा असलेला दखलपात्र गून्हा कींवा मृत्यूदंड असलेला गून्हा केला आहे त्या व्यक्तीला न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाशिवाय किंवा वारंटशिवाय अटक करू शकतात.
७ वर्ष कींवा ७ वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या दखलपात्र गून्ह्यामध्ये अटक करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्नेषकुमार विरूद्ध बीहार या न्यायनिवाड्यामध्ये काही दीशानिर्देष दीले आहेत.
-ॲडव्होकेट जयंत मुरलीधर नाकाडे
मंगरूळपीर जि.वाशिम
मो.9373290327