Home वाशिम ध्यास आणी जिव्हाळा फाऊंडेशनचा महिलांच्या समस्येवर पुढाकार…….

ध्यास आणी जिव्हाळा फाऊंडेशनचा महिलांच्या समस्येवर पुढाकार…….

125

महीलांसाठी सॅनेटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी मशीन मागणीकरीता जिल्हाधिकारी यांना निवेदन

फुलचंद भगत
मंगरुळपीर : ध्यास व जीव्हाळा फाऊंडेशनच्या संचालिका अश्विनी राम अवताडे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी शंन्मुखराजन यांना सॅनिटरी पॅड जाळण्यासाठी मशीन उपलब्ध करणे बाबत निवेदन दिले,या निवेदनात अंतर्गत सॅनिटरी पॅड मुळे जे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ते रोखण्यासाठी बाजारात “Incinerator vending machine ” उपलब्ध आहे ते मशीन शहरी विभागामध्ये नगर परिषद कडून तसेच ग्रामीण विभागामध्ये ग्रामपंचायत कडुन प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी असे अश्विनी अवताडे यांनी निवेदनाव्दारे सांगितले.
अवताडे यांना महिला सक्षमीकरणाचे काम करता करता त्यांच्या असे लक्षात आले की महिलांचे जे काही प्रश्न आहे त्यामध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेचा हा एक प्रश्न आहे आणि त्यामध्ये सॅनिटरी पॅड हा एक मुख्य घटक आहे सॅनिटरी पॅड विषयी खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे पण वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी महिलांना कोणताही योग्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आला नाही किंवा त्याच मार्गदर्शन पण नाही. त्यामुळे महिला हे पॅड कचरापेटीत व इतर ठिकाणी टाकून देतात आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे तसेच कचरा गाडी टाकल्यावर त्याचा परिणाम स्वच्छता कामगार यांच्या आरोग्यावर होत आहे,तसेच इतर ठिकाणी टाकला मुळे मानवी आरोग्यावर, निसर्गावर त्याचा मोठा परिणाम होत आहे हे सगळं टाळण्यासाठी या मशीन सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे जेणेकरून महिलांना व मुलींना पॅडची विल्हे वाट लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल महिलांमध्ये या मशीन विषयी जनजागृती करण्याचे काम मंगरूळपीर मध्ये गेल्या कित्येक दिवसापासून त्या करत आहे,तसेच मंगरूळपीर मध्ये मशीन उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी नगर परिषद सोबत बोलून महिलांसाठी एक वेगळा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कचरा गाडी च्या मागे एक लाल बॉक्स लावून देण्यात आला आहे त्यामध्ये महिला सॅनिटरी पॅड इतर ठिकाणी न टाकता किंवा कचरा पेटी न टाकता त्या बॉक्समध्ये टाकतात, त्यांचा असं मत आहे की, वाशिम मध्ये कुठल्या ही ठिकाणी जाऊन त्या महिलांना मार्गदर्शन करायला तयार आहेत फक्त प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मशीन उपलब्ध करून देण्यात याव्या जेणेकरून त्यामुळे जे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ते टाळल्या जाईल व खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न ही मिटेल. सॅनिटरी पॅड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे प्रमाण असते ते जिथे टाकले ते तिथेच किती वर्षानुवर्षे पडून राहते त्याचे विघटन होत नाही त्यामुळे खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे तसेच कचरा गाडी टाकल्यावर स्वच्छता कामगार वर्गांना हाताने कचरा वेगळा करावा लागतो, त्यामुळे या सॅनिटरी पॅड चा त्यांच्या आरोग्यावर खूप जास्त प्रमाणात परिणाम होत आहे त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मशीन उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली निवेदनामध्ये केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर मशीन उपलब्ध करून द्याव्या असे निवेदनात नमूद आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम