Home वाशिम खेळाडूला संघर्षातूनच यश मिळते-कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे

खेळाडूला संघर्षातूनच यश मिळते-कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे

148

फुलचंद भगत

वाशिम:-आलम्पिक आणि पॅरा-ऑलम्पिक मध्ये आपल्या देशातील विविध क्रीडा प्रकारात-सध्या स्थितीत राष्ट्रीय खेळाडूनी लक्षवेधी यश प्राप्त करून संपूर्ण देशाला क्रीडा क्षेत्राकडे वळविले आहे. त्याचाच बोध आपल्या वाशिम जिल्ह्याने घेतला असे यावेळी म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण एक नव्हे तर 3 रायफल शूटरची थेट नँशनल स्पर्ध्येत तर 3 मुलीसह एका मुलाची प्री-नँशनल रायफल / पिस्टल शूटिंग स्पर्ध्येत निवड होणे, ही वाशिम जिल्ह्यासाठी खूप मोठी गौरवशाली बाब आहे.त्यामुळे या 7 खेळाडूनी अतिकष्ट व आपल्या संघर्षातुन राष्ट्रीय स्पर्ध्येत देखील यश प्राप्त करावे,कारण यश हे आपल्या संघर्षातुनच मिळते असे प्रतिपादन वाशिम जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांनी केले. ते वाशिम जिल्हा रायफल आसोशिएशन व समस्त पालक ग्रुपच्या वतीने आयोजित रायफल शूटर यांच्या सत्कार समारंभा मध्ये बोलत होते.
यावेळी वाशिम तहसीलदार विजय साळवे व रायफल असो.अध्यक्ष दिलीप हेडा यांनी सुद्धा उपस्थितीना मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी नँशनल रायफल/ पिस्टल शूटिंग स्पर्ध्येमध्ये निवड झाल्याने क्षितिज राऊत,रुषभ ढवळे, अरहंत घुगे,यांचा तर प्री-नँशनल रायफल शूटिंग स्पर्ध्येत चैतन्य नागरे याची ,तर मुली मधून सोनल चव्हाण, मृणाली आकरे, जानवी मानतकर,या पिस्टल शूटरचा सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष वाशिम जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे,तर प्रमुख अतिथी म्हणून वाशिम तहसीलदार विजय साळवे,राऊत उपअधीक्षक कारागृह,अध्यक्ष वाशीम जिल्हा रायफल असो.दिलीप हेडा,अतिरीक्त कार्यकारी अभियंता महावितरण पुरुषोत्तम चव्हाण, जी. प. सदस्या कल्पनाताई राऊत,जेष्ठ क्रीडापट्टू रफिक खान मामु,अध्यक्ष ऑल स्पोर्ट असो.बाळासाहेब गोटे,सचिव रायफल असो.निशा शिवणकर,अंतर राष्ट्रीय कराटे कोच सुनील देशमुख,पत्रकार सुनील कांबळे, रायफल शूटिंग कोच,म.पो.प्रल्हाद आळणे हे होते, तर यावेळी प्रसार माध्यम जिल्हा प्रतिनिधी,पत्रकार विठ्ठल देशमुख,गणेश मोहळे, इम्रान खान,अतिष देशमुख,गोपाळ व्यास,विशाल राऊत,अजय ढवळे, सुनील कांबळे पै.सागर आळणे यांचाही देखील सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन वाशिम जिल्हा रायफल असोसिएशन व पालक ग्रुपचे सदस्य- पुरुषोत्तम चव्हाण, कैलास राऊत,विद्याधर मानतकर,अरविंद घुगे,महेश आकरे,कैलास नागरे,अजय ढवळे यांनी केले,तर सुत्रसंचाल अरविंद घुगे यांनी व आभार प्रदर्शन प्रल्हाद आळणे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सागर आळणे,संतोष आळणे,कैलास बोरकर,आकाश खरटकर,उमेश कालापाहाड,ऋषिकेश राऊत यांनी परिश्रम घेतले.