Home वाशिम शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा‌ तरच वाशिम जिल्हा समृद्ध होईल-फुलचंद भगत

शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा‌ तरच वाशिम जिल्हा समृद्ध होईल-फुलचंद भगत

197

 

मंगरुळपीर:प्रशासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास वाशिम जिल्हा समृद्ध होईल.सर्व योजनांची अंमलबजावणी जनतेच्या समन्वयातुन करावी जेणेकरुन या कामात लोकांचाही सहभाग मिळेल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केले.पीकविमा कंपनी , राष्ट्रीय महामार्ग,आणि महावितरण च्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी चौकशीअंती कारवाई करण्यात यावी.
वाशिम जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे त्यामुळे प्रशासनाच्या असलेल्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे कृषी, पीकविमा, आरोग्य, शिक्षण, ,राष्ट्रीय महामार्ग,रेल्वे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून सर्व सामान्य जनतेला सुविधा पुरविल्या पाहिजेत असे फुलचंद भगत म्हणाले.सर्वसामान्य जनतेची कामे करताना अधिकाऱ्यांचे गैरवर्तन खपवून घेतले जावू नये. अकार्यक्षम अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करून सर्व सामान्य जनतेची कामे प्राधान्याने करावीत असेही ते म्हणाले. पिकविम्याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारीवरून कृषी विभाग आणि संबंधित पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही विनंती केली की,पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, तालुका स्तरावर विमा कंपनीचे कार्यालय सुरू करून स्थनिक लोकप्रतिनिधीला माहिती सादर करावी ७२ तासाच्या आत नुकसानीची तक्रार रद्द करा, पीक पैसेवारी, आणेवारी आणि पीक कापणी चे चित्रीकरण करण्याबाबत समित्या स्थापन करा आणि याबाबत तातडीने माहिती सादर व्हावी असेही सांगीतले. स्वच्छ भारत मिशन,सिंचन विहीर योजना, फळबाग लागवड, शेळीपालन, पांदणरस्ते, गोठा योजना, मध्यान भोजन, उज्वला गॅस योजना,भूमीअभिलेख यासह विविध योजना राबवतांना त्या योजना गरजुपर्यतच पोहचतील याची प्रशासनाने काळजी घ्यावी.शासकीय अधिकारी निगरगट्ट असतात याची प्रचिती सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधींना सुद्धा वेळोवेळी आली आहे. बऱ्याचदा दिलेल्या पत्राला उत्तर दिले जात नाही.तक्रारकर्ते आणी लोकप्रतिनिधी ने दिलेल्या पत्राला योग्य वेळेत उत्तर दिले जावे आणि तातडीने त्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंतीही सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.