Home विदर्भ वर्धा नदीत बोट उलटून अकरा जणांचा मृत्यू…..

वर्धा नदीत बोट उलटून अकरा जणांचा मृत्यू…..

166

मनिष गुडधे – अमरावती

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

अमरावती – वर्धा नदीत बोट उलटुन अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि अमरावती जिल्ह्यातील गाडेगाव येथील धक्कादायक घटनेत तीन जणांचे मृतदेह काढण्यात यश आले असून आठ जणांचा शोध सुरू आहे. बेनोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील गाडेगाव येथील दशक्रिया करण्याकरिता झुंज या गावी गेले होते कुटुंब झुंज तीर्थक्षेत्र स्थळे काही धार्मिक विधी पाठवून देत असताना वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटल्याने अकरा जणांना जलसमाधी मिळाली आहे याची भीती व्यक्त केली जात आहे यापैकी तीन मृतदेह सापडले असून उर्वरित जणांच्या शोध कार्य सुरू आहे.