Home विदर्भ जनतेच्या सार्वजनिक आरोग्यासोबत प्रशासनाची उदासिनता

जनतेच्या सार्वजनिक आरोग्यासोबत प्रशासनाची उदासिनता

123

इर्विन हाॅस्पिटल मध्ये जावुन वंचित ने केली आरोग्य प्रशासनाची पोलखोल.

जिल्हा प्रतिनिधि – मनिष गुडधे

अमरावती – कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी शहरातील अस्वच्छता, वातावरण बदल व सतत चा पडणारा पाऊस यामुळे सर्दी खोकला ताप चे प्रमाण वाढले आहे. या मध्ये लहान मुलांमध्ये व्हायरल तापाची लक्षणे जास्त वाढली आहे. त्यामुळे सरकारी दवाखान्यात OPD संख्या वाढली व वार्ड हाउसफुल झाली आहे. म्हणुन
अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्री रुग्णालय व मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र या सगळ्यांची कार्यप्रणाली व तेथे डेंगू, मलेरिया, सर्दी-खोकला तसेच अनेक कारणांनी भर्ती असलेल्या रुग्णांची सोय-गैरसोय पाहण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने महासचिव, मा. किरणभाऊ गुडधे व रुग्णसेवक सुरेशभाऊ तायडे यांच्या नेतृत्वात सरकारी हाँस्पिटल दौरा आज दि. १२ सप्टेंबर रोजी करण्यात आला. यांनी प्रत्यक्ष वार्डा- वार्डात जावुन रुग्णांच्या तब्येतीची विचारपुस केली तसेच सोई सुविधांबद्दल माहीती जाणुन घेतली.जिल्हा रुग्णालयाची OPD चा वेळ रोज सकाळी ८ ते २ असला तरी नियमीत डाॅक्टर व स्टाफ वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांना तात्काळत रहावे लागते. आकस्मिक वार्ड मध्ये एकच डाॅक्टर असल्याने कामाचा ताण पडतो. २७५ बेड व ५ आय सी यु बेड हे तुटपूंजे असल्याने एका बेडवर दोन रुग्ण असल्याचे वार्डाची पाहणी केली असता आढळले. अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात तुटपुंज्या सोई असल्याने नाईलाजास्तव बाहेरच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यायला यावे लागते. सिटी स्केन मशिन फक्त डोक्याचेच होते इतर शरीराच्या अवयवाचे सिटी स्केन होत नसल्याने बाहेरुण सिटी स्केन करावे लागते. मायक्रो सोनोग्राफी, MRI, EEC मशिन उपलब्ध नाही. लोकसंख्येच्या मानाने फक्त ३०% स्टाफ उपलब्ध आहे. रुग्णालयात सेवा देण्यासाठी फक्त ८६ नर्सेस आहेत. डाँक्टरांची संख्या कमी आहे. वार्डातील स्वच्छता गृहांची नियमीत साफसफाई होत नसल्याने प्रत्येक वार्डात वास व अस्वच्छता पसरली आहे. RMO डाॅ. नरवडे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. रुग्णसंख्या वाढल्याने व स्टाफ कमी असल्याने योग्य प्रकारे सेवा देता येत नाही. शासनाने त्वरित स्टाफ उपलब्ध करुन देण्याची मागणी त्यांनी केली. यातुन सरकारी आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती व यात काय सुधारणा करता येईल यावर उपाययोजना करण्याची तसदी वंचित द्वारे देण्यात आली. वंचित बहुजन आघाडी चे किरणभाऊ गुडधे, रुग्णसेवक सुरेश तायडे, वैभव रायबोले, दिपक मेटांगे, विजय सवाई, मिलिंद दामोधरे, प्रशांत मेश्राम, साहेबराव नाईक, जे एम गोंडाणे, शेशनाग गजभिये, उमेश ढोके, मंगेश कनेरकर व अनिकेत गजभिये कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित होते.