Home नांदेड आरक्षण पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी माहूर भाजपाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन.

आरक्षण पुन्हा सुरू करावे या मागणीसाठी माहूर भाजपाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन.

356

मजहर शेख,नांदेड

नांदेड/माहूर,दि. १६ :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आल्याचा आरोप करून राज्यभर धरणे आंदोलन करण्याचा आदेश वरीष्ठ नेत्यांनी दिला होता. त्याला अनुसरून तालुका भाजपने माहूरचे योगी प. पू. श्यामबापु भारती महाराज व युवानेते अॅड.रमण जायभाये यांच्या नेतृत्वात बुधवार दि.15 सप्टें.रोजी स.11 वा. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन केले.
या प्रसंगी ओबीसी समाजाला राजकीय व सामाजिक आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने न्यायालयात मजबुत बाजू मांडली नसल्याचा फटका या समाजाला बसला असून त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप प.पु.श्यामबापू व तालुकाध्यक्ष अॅड. दिनेश येउतकर यांनी केला.या आंदोलनात शहराध्यक्ष गोपु महामुने, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष पवार,तालुका सरचिटणीस निळकंठ मस्के,अच्युत जोशी, आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय पेंदोर,ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले,अविनाश भोयर, पद्मा गि-हे ,राजू दराडे, देवराव कूडमेते, हरीश मुंडे, कैलास फड, संतोष तामखाने,अर्जून मोहीते यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदन स्वीकारतांना तुमच्या भावना शासनाला कळविण्याचे आश्वासन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी दिले.कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पो.नि.नामदेव रिठ्ठे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.