लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी
अंबड येथून देवदर्शन करुन गावाकडे परत जात असताना शहापुर गावाजवळ अज्ञात वाहनांनी दुचाकीला धडक देवून २५ वर्षीय महिला जागीच ठार झाली.तर दोघे बापलेक या अपघातात जखमी झाले आहे.
शनिवारी,१८सप्टेंबर रोजी अंबड येथे देवदर्शनासाठी आलेले गेवराई तालुक्यातील किनगाव येथील पांडुरंग मधुकर चाळक (वय ३१ वर्ष ) व पत्नी स्वाती पांडुरंग चाळक वय (२५ वर्षे ) या दोघा पती-पत्नी सोबत मुलगा ही होता.हे सर्व अंबडहुन स्प्लेंडर दुचाकी क्र.एम. एच.२३ ए.ए.१५०२ वरून किनगाव गावी परत जात असताना जालना-वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गावर शहापूरजवळ येताच अज्ञात वाहनांची जोरात धडक दिली.
यात स्वाती चाळक जागीच रक्ताच्या थारोळयात पडुन जागीच मुत्यू पावल्या तर पांडुरंग व त्यांच्या मुलगा दोघेही गंभीररीत्या जखमी होऊन सर्वांना अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.