मजहर शेख,नांदेड
नांदेड/किनवट,दि : १८ :- मराठवाडां मुक्तीसंग्राम दिनानिमित्त राबविलेल्या विशेष कोविड -19 लसीकरण मोहिमेअंतर्गत तालुक्यात पाच हजार नऊशे आठ लोकांनी लस घेऊन नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक लस घेण्याचा बहुभान तालुक्याला मिळवून दिला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त जिल्ह्यात कोविड -19 लसीकरण विशेष मोहिम राबविण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी तालुक्यात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विविध बैठका घेऊन आखणी केली. गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीची सर्व टीम, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाची सर्व टीम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे याच्या नेतृत्वात आरोग्य विभागाची सर्व टीम लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सज्जतेने मैदानात उतरली होती.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजवंदन झाल्यानंतर सभागृहात आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार,तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उप सभापती कपिल करेवाड, प्रभारी नगर परिषद मुख्याधिकारी तथा नायब तहसिलदार सर्वेश मेश्राम, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरीक्षक मारोती थोरात , माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, साजीद खान, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक अभय महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड -19 विशेष लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ. झडते यांच्या नेतृत्वात डाटा एंट्री ऑपरेटर सतीश गुरव, परिचारिका एस. एम. वाढई व व्ही.एल. मडावी ह्या व्हॅक्सीनेटर म्हणून उपस्थित होत्या. उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा व नागरी दवाखाना, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने किनवट शहरात 742 लस, वैघकीय अधिक्षक डॉ. विक्रम राठोड यांच्या नेतृत्वात ग्रामीण रुग्णालय, मांडवी येथे 50 लस व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 हजार एकशे सोळा लस देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लस अशा : अप्पारावपेठ 326, बोधडी (बु) 740, दहेली तांडा 516, इस्लापूर 916, जलधारा 413, कोठारी (सि) 791, राजगड 506, शिवणी 468 व उमरी (बा ) 440 अशा प्रकारे आज एकाच दिवशी तालुक्यातून 5 हजार नऊशे आठ लस देण्यात आल्या. संपूर्ण जिल्ह्यातून लसीकरणात किनवट तालुका प्रथम क्रमांकावर आहे. जनजागृती सहायक उत्तम कानिंदे यांनी लसीकरण जागृतीची धुरा सांभाळली.