चाकातिर्थच्या दुहेरी हत्याकांडाने वाशिम जिल्हा हादरला
: घटनास्थळी कुर्हाड व कानातील हेडफोन आढळले
वाशिम जिल्ह्यात उडाली खळबळ
फुलचंद भगत
वाशिम :-चाकातिर्थ येथील दुहेरी हत्याकांडाने सध्या वाशिम जिल्हा हादरला आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चाकातीर्थ येथे पती पत्नीची धारधार शस्त्राने हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दुहेरी हत्याकांडाने जऊळका पोलीसासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या डव्हा तीर्थक्षेत्रापासून जवळच असलेल्या चाकातीर्थ येथे विश्वनाथबाबाचे समाधीस्थळ आणि हनुमान मंदिर व राजा बाबाचे समाधी स्थळ आहे. मंदिराची देखभाल डोंगरकिन्ही येथील गजानन निंबाळकर देशमुख वय ६० वर्ष, निर्मला गजानन निंबाळकर देशमुख दाम्पत्य गत वीस वर्षांपासून निवास करीत होते. भक्तिभावाने सेवा देणार्या निंबाळकर दाम्पत्याची रात्री त्यांच्या राहत्या खोलीत पाठीमागुन घरात शिरून अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडल्याचे जिल्हयात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून श्वान पथकाने मारेकर्यांचा डव्हाच्या रस्त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसानी घटनास्थळावरून एक कुर्हाड आणि हेडफोन जप्त केले असल्याची माहिती मिळाली आहे. खुनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसा समोर उभे आहे. पुढील तपास ठाणेदार आजीनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206