Home जळगाव जि.प.शाळा वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जि.प.शाळा वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

188

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २४ :- जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा वडाळी दिगर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त व तंत्रस्नेही उपशिक्षक निलेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचें मुख्याध्यापक योगेश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राहुल शिनगारे उपस्थित होते.सूत्रसंचलन व आभार उपशिक्षक संदिप पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले व जीवनकार्य विषयी माहिती देण्यात आली.वाढदिवसानिमित्त बोलताना निलेश भामरे यांनी सांगितले की,वाढदिवसचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी काही तरी नाविन्यपूर्ण करण्याचा संकल्प असल्याने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वह्या व शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात पण वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत असा चांगला उपक्रम घेतल्यास निश्चित विद्यार्थ्यांना तो लाभदायी ठरणार आहे असे मत मुख्याध्यापक योगेश काळे यांनी व्यक्त केला.शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ म्हणून केक देण्यात आला यामुळे केक व वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.