भर दिवसा महाकाय झाड कापले
संबंधीताचा कानाडोळा,प्रशासनाने चौकशी करण्याची गरज
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील राठी कलेक्शन व पुष्पांजली कापड केंद्रा समोर असलेल्या जागेवरील महारुख या विशाल वृक्षाची 17 सप्टेंबर रोजी भर दिवसा कत्तल करुन शासनाच्या वृक्ष लागवड या योजनेला हडताळ फासण्याचा प्रकार मंगरुळपीर येथे घडला.सबंधित झाड कुणाच्या हद्दीत होते याची चौकशी करुन पुढील कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
शहरातील बॅंक आॅफ इंडीयाजवळचे जे झाड भरदिवसा कापले वास्तविकता या विशाल वृक्षाचा कोणालाही कोणताच त्रास नव्हता असे नागरिक बोलत आहेत.उन्हाळ्यात या वृक्षाच्या सावलीचा आधार व थंडावा वयोवृद्धांना मिळत होता. सदर वृक्ष तोडण्यासाठी परवाना घेतला काय? कुणाच्या परवानगीने झाड तोडण्यात आले? कुण्या खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या जागेत हे झाड होते का?असे प्रश्न उपस्थित होत आहे. झाडे लावा, झाडेझाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेत शासन प्रचार, प्रसार करत प्रयत्नांची पराकाष्ठा करुन मानव जातीला जागरुक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाने सर्वत्र हाहाकार घातल्यामुळे प्राणवायू मिळवण्यासाठी हतबल होत तडफडून रोज जीवच्या जीव गतप्राण होत आहेत.अशी गंभीर परिस्थिती असतानाही मानव जात जागृत व्हायला तयार नसून मंगरूळपीर शहरातच नव्हे तर ग्रामिण भागातही दररोज उभ्या झाडांच्या कत्तलीवर कत्तली होत असून, राजरोसपणे तोडलेल्या लाकडांची उघडपणे वाहतूकही केली जात आहे. असे असतानाही वन विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत आहे का झोपेचं सोंग घेतेय हा सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे.सद्यस्थितीला ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करुन होत असलेली वाहतूक पाहता एकीकडे शासन वृक्ष लागवड साठी प्रयत्नशील असतानाच होत असलेली वृक्षतोड कशी वन विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना दिसत नाही? का ते झोपेचं सोंग घेत स्वतः ची पोळी लाटून घेत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
*तोडलेल्या झाडाविषयी पोलिस तक्रार*
दिवसाढवढ्या झाडाची केलेली कत्तल यातील जबाबदार व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले आहे असे कळले.तसेच झाड कापण्याची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.आणखीन तीन झाड जुन्या स्टँड चे लिजवरील दुकानामागील चोरून कापण्यात आले त्याबाबत चौकशी करून पोलिसांना माहीती देण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. परवानगी शिवाय घरातील झाड सुद्धा कापता येत नाही.नागरिकांनी सतर्क राहणे व तात्काळ पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे असे नगरपरिषदेने कळवले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206