मुस्लिम बांधवासह प्रशासकिय अधिकार्यांचीही ऊपस्थीती
फुलचंद भगत
वाशिम:-पंचक्रोशीत प्रसिध्द असलेल्या वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील बिरबलनाथ गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले.या विसर्जन प्रसंगी सर्वधर्मसमभावाचे ऊत्तम ऊदाहरण निर्माण झाले असुन मानाच्या समजल्या जाणार्या या गणपती विसर्जन सोहळ्याला मुस्लिम बांधवासह प्रशासकीय अधिकार्यासह सर्वधर्मीयांनी हजेरी लावल्याने यंदाचा हा ऊत्सव सर्वधर्मीयाचे प्रतिक ठरला आहे.
बिरबलनाथ महाराज संस्थान हे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे असुन या संस्थानमार्फत विविध धार्मिक तथा सामाजिक ऊपक्रम संस्थानचे सचिन रामकुमार रघुवंशी व त्यांचे सुपुञ अविश रघुवंशी यांच्या पुढाकारातुन वेळोवेळी राबवण्यात येत असतात.पंचक्रोशीत नावाजलेल्या या संस्थानाकडुन दरवर्षी गणपती ऊत्सवही साजरा करण्यात येतो.हा गणपती मानाचा समजला जातो त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत प्रथम क्रमांकावर असतो.परंतु गेल्या दोन वर्षापासुन कोरोणाच्या पार्श्वभुमीवर सणऊत्सवावर प्रशासनाने निर्बंध घातल्या गेल्याने श्री ची विसर्जन मिरवणूकही रद्द केल्या गेली.शासनाने घालुन दिलेल्या नियमानुसार यंदा बिरबलनाथ महाराज संस्थानच्या मानाच्या गणपतीला भावपुर्ण निरोप देवुन विसर्जन केले.या विसर्जन कार्यक्रमात सर्वधर्मसमभावाचे ऊत्कृष्ट ऊदाहरण पाहावयास मिळाले.मुस्लिम बांधवांनी या मानाच्या गणपती विसर्जन सोहळ्यात विषेश ऊपस्थीती दर्शवून एकतेचा संदेश दिला.मंगरूळपीर येथे बिरबलनाथ महाराज संस्थान आणी जगात साडेतिन कलंदरापैकी एक कलंदर असलेला दादा हयात कलंदर दर्गा आहे.बिरबलनाथ संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी तर दर्गा ट्रष्टचे शमशोद्दीन जहागिरदार यांची दोस्ती नावाजलेली आहे.ते दोघेही सर्वधर्मीयांच्या सणऊत्सवात न चुकता हजर राहुन एकतेचा संदेश देतात हे विषेश.मानाच्या गणपती विसर्जनातही जहागिरदार यांनी ऊपस्थीती दर्शवली.या विसर्जन सोहळ्याला बिरबलनाथ महाराज संस्थान चे सचिव रामकुमार रघुवंशी,दर्गाह ट्रस्टचे शमशोद्दीन जहागिरदार,पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे,माजी नगराध्यक्ष प्रा.विरेंद्रसिंह ठाकूर, नगर परीषदेचे राजेश संगत,राजेश खंडेतोड, कारकळ,क्षिरसागर,अविष रघुवंशी, योगेश रघुवंशी, मंगेश रघुवंशी, ओम दुबे, कृष्णकुमार रघुवंशी, रमेशसिंग ठाकूर, रमेशसिंग रघुवंशी,पञकार रमेश मूंजे,विनोद डेरे,देविकिसन काबरा,गजमफर हुसैन,राजकूमार ठाकूर,राजेश दबडे,फुलचंद भगत,ऊबेद मिर्झा,आदी मान्यवर ऊपस्थित होते.मंगरुळपीर शहरातील इतरही मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.गणेशमुर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेकडुन चौकाचौकात सजवलेल्या रथात गणेशमुर्ती संकलीत करून दस्तापुर येथील धरणात विधिवत विसर्जन करण्यात आले.यावेळी पोलीस विभागाने ऊपविभागिय पोलिस अधिकारी यशवंत केडगे आणी ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.