दागिन्या साठी चोरट्यांनी महिलेच्या कानाचे लचके तोडले ,
अमीन शाह ,
बुलढाणा – अंगावरील दागिने ओरबाडून नेण्यासह महिलेची हत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील भुमराळा या गावी उघडकीस आली आहे. कासाबाई चौधरी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून दागिने ओरबाडून नेल्याच्या खुणा अंगावर दिसून आल्या आहेत. कानातील दागिने लुटून नेण्यासाठी तर कानाचे लचकेच हल्लेखोरांनी तोडल्याचे घटनास्थळी पोलिसांना दिसून आले आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे.
शेतमजूर असलेल्या कासाबाई या वृद्ध महिलेचा हल्लेखोर लुटारुंनी गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना समजल्यानंतर पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरुवात केली. मयत कासाबाई चौधरी या महिलेच्या अंगावर कानातील सोन्याचे रिंग, पाच ग्रॅम कानातील सोन्याची फुले, हातात चांदीचे कडे व पाटल्या, बत्तीस तोळे मंगळसूत्र असा एकंदरीत 56 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.न. 167/21 भा.द.वि. 394, 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.