डॉ.निरज वाघमारे मित्र परिवाराचा पुढाकार
यवतमाळ : कोरोना काळात गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सण आणि उत्सवावर निर्बंध लावल्या नंतर हे सण – उत्सव निर्बंध पाळून घरीच साजरे करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ह्या वर्षी गणपती उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे न करता घरगुती उत्सवाला भाविकांनी पसंदी दिली. भाविकांच्या ह्या उत्सवाला प्रोत्साहित करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे मित्रपरिवार यांच्या वतीने नेताजी नगर, वैशाली नगर, माधव कॉलनी, पटवारी कॉलनी या भागांमध्ये घरगुती गणपती सजावट आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकाला खुले प्रवेश ठेवण्यात आले होते. तर यात प्रथम पारितोषिक ३३३३/- द्वितीय २२२२/- तृतीय ११११/- तर प्रोत्साहन पर ५५५/- रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. सदर स्पर्धेत शेकडोच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. घरी प्रतिष्ठापणा केलेल्या बाप्पाची नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतीने नाविन्यपूर्ण सजावट करून त्या माध्यमातून सामाजिक संदेश आणि प्रबोधन करणाऱ्यांना स्पर्धकांना विजेता ठरविण्यात आले.
यामध्ये पेपर रद्दीतून बापाचा देखावा साकारणारे रवी बिसमोरे यांना प्रथम पारितोषिक, कृत्रिम सजावट, नाविन्यपूर्ण व आकर्षित दिसणाऱ्या देखाव्यासाठी अमित राऊत यांना द्वितीय पारितोषिक तर बापाच्या सजावटीतून कोरोना प्रतिबंधित उपाययोजनांचा संदेश देणाऱ्या श्री. शेलोटकर यांना तृतीय पारितोषिक व रामेश्वर गेडाम आणि प्रकाश नेरले यांना प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व सर्व स्पर्धेकांना त्यांच्या बाप्पा सह त्यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. या स्पर्धेचे परीक्षण जयंत चावरे यांनी केली तर काल अनंत चतुर्दशीला या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धेचे आयोजक डॉ.निरज वाघमारे मित्र परिवाराचे डॉ. निरज वाघमारे, सचिन राऊत, सुरज मेश्राम, जितू उमरे, आशिष वानखेडे, महेश वाघमारे, नितेश बहाळे, बुद्धरतन कांबळे, हरीश कामारकर, मोबीन खान, प्रथमेश तायडे यांच्या हस्ते करण्यात आले…