शरीफ शेख – रावेर
जळगाव , दि. २४ :- धुळे महामार्गावर तूराट खेडे तालुका पारोळा येथे २२ जानेवारी रोजी झालेल्या रस्ते अपघातात जळगाव शहरातील मासूम वाडी येथील मनियार बिरादरीचे दोन सख्खे भाऊ अपघातात मरण पावल्याने त्या कुटुंबीयांवर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण जळगाव तसेच प्रोजेक्ट मॅनेजर ऍग्रो इन्सफ्रास्ट्रक्टर भारतीय महामार्ग यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन मनियार बिरादरीचे महाराष्ट्र व जळगाव अध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद, महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर अल्तमश शेख, डॉक्टर एम ईकबाल, रफिक शेख करीम, इक्बाल शेख सत्तार, तसेच मन्यार वाड्यातील व मासूम वाडीतील शेकडो तरुणांनी भारतीय राष्ट्रीय राज्य मार्गाच्या कार्यालयात बैठक आंदोलन सुरू केले असता श्री मनीष कापडणे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी सदर प्रकरणी फारुक शेख यांच्याशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारून एका दिवसाच्या आत वरिष्ठ कार्यालयातून मार्गदर्शन घेऊन काहीतरी भरपाई देण्याचा नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
प्रोजेक्ट डायरेक्टर श्री सिन्हा साहेब हे कार्यालयात उपलब्ध नसल्याने त्यांचे निवेदन त्यांचे सहकारी दिग्विजय पाटील यांना देण्यात आले व दूरध्वनीद्वारे द्वारे फारुक शेख यांनी त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सोमवारी कार्यालयात या आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिल्याने सदरचा घेराव तात्पुरता स्थगित करण्यात आला. अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या दोघा तरुणांबद्दल कार्यालयतिल सर्वानि हळहळ व्यक्त केली.