Home उत्तर महाराष्ट्र प्रतिकुलतेला भिडत माध्यमकर्मींनी साकारला “सपान सरल”चित्रपट

प्रतिकुलतेला भिडत माध्यमकर्मींनी साकारला “सपान सरल”चित्रपट

382

नाशिक – चित्रपटनिर्मिती ही धनदांडगे मंडळींच टीमवर्क,मात्र नाशिकच्या आनंद पगारे या युवकाने स्वतःच्या पुकार फिल्म प्रॉडक्शन च्या निर्मिती खाली “सपान सरल”हा मराठी चित्रपट साकारला,या निर्मितीसाठी स्वतःचा अभ्यास व आयुष्याची पुंजी खर्ची लावून सातत्याने सामान्य माणसाला भेडसावणारा,व स्वतःला अस्वस्थ विषय घेऊन तब्बल २ वर्षे अनेक अडथळे पेलत आनंद उर्फ दादाजी पगारे यांनी हा चित्रपट साकारला आहे.याकामी त्याला सामाजिक चळवळीतील सहकाऱ्यांची साथ लाभली असल्याचे ते सांगतात.एकूणच या निर्मितीसाठी त्यांच्या यशस्वी परिश्रमाला अनेकांनी दाद दिली असून लवकरच “सपान सरल”हा मराठी चित्रपट एक ज्वलंत वास्तविक मुद्दा घेऊन आपल्यासमोर येणार आहे.

दरम्यान चित्रपटनिर्मिती म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर मोठी नावे येतात दादा कोंडके,व्ही शांताराम,सुषमा शिरोमणी व आताच्या काळात महेश कोठारे,महेश मांजरेकर,नागराज मंजुळे अशी नावाजलेली नावे येतात.यासाठी मोठे टीमवर्क असते त्यात जाणकार व अनुभवी मंडळींची साथ असते,तेव्हाच मराठी निर्मिती होते,या क्षेत्रात सध्या नव्या दमाचे अनेक निर्माते येत असले तरी स्व.चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत नाशिकच्या भूमीतील सायने या छोट्या गावातील आनंद पगारे या युवकांने आपल्या अभ्यास व जिद्दीच्या जोरावर उत्तम तंत्रज्ञ व डिजिटल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “सपान सरल”हा मराठी चित्रपट यशस्वीपणे पूर्ण केला आहे.त्यासाठी त्याला त्यातील जोडलेल्या कला क्षेत्रातील धडपड्या मित्रांचा तसेच व्यवस्थापन व संवाद कौशल्याचा या निर्मिती साठी लाभ झाला.स्वतःची परिस्थिती विसरून त्याने मराठी चित्रपट महामंडळाकडून स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस नोंदणी करून आपल्या स्वलिखित पटकथा संवाद स्क्रिप्ट रजिस्टर करून ही निर्मिती केली.नाशिकमध्ये चित्रपट,माहितीपट,अल्बम,टेलिफिल्म,बेबसिरीज निर्मितिच्या चित्रिकरणास संधी आहे.त्यादृष्टीने जल,जमीन,जंगल या नैसर्गिक स्थितीत आपले खडतर जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित तसेच संबंधित पात्रांच्या एका शासकीय योजनेसाठीची ससेहोलपट दर्शवणारा वास्तविक विषयाशी जोडलेल्या विषयाचा “सपान सरल”हा मराठी चित्रपट नाशिक जिल्ह्यातील पेठ,जव्हार,पालघर,नाशिक,त्रंबकेश्वर,इगतपुरी, दिंडोरी तालुक्यात चित्रित केला आहे.एकूणच या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन,कैमेरामन म्हणून आनंद पगारे,प्रॉडक्शन किरण मोरे,सुरेश ताठे, पटकथा,गीतलेखन दिवंगत शंतनू कांबळे(नाशिक मधील सामाजिक चळवळीतील व्यक्तिमत्त्व,परिवर्तनाची गाणी लिहिणारा),नाना गांगुर्डे त्रंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथील गीतलेखक,गायक नाना गांगुर्डे,संगीतकार मधुकर रेडकर,देवानंद पाटील,गीत गायक म्हणून रविंद्र साठे,दीपाली गांगुर्डे,निशा भगत यांनी गायली आहे.मेकअप कोस्टूम वैशाली पगारे यांचे आहे.मुख्य भूमिकेत कोर्टफेम दिवंगत विरा साथीदार,मायाताई खोडवे,विलास कांबळे,प्रा.राजू देसले,
राम खुर्दळ,योगेश कापसे,रामदास उन्हाळे,सुनील मोरे,गोकुळ पवार,डॉ विशाल जाधव,प्रमिला पवार हे आहेत.
दरम्यान नाशिक ही स्व चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची नगरी,या नगरीत चित्रपट,मालिका निर्मिती,चित्रिकरणास मोठी संधी आहे,इथले वातावरण,निसर्ग,गडकोट,पर्वतरांगा,घाट,जुनी मंदिरे,धबधबे,वर्षभर वाहणाऱ्या रम्य नद्या,गावे,शहरे,गार्डन,जंगल,शेती,वाडे,पुरातन वास्तू असे,साजेसा निसर्ग असे पुरेपूर आहे,नाशिक ही चित्रपटशृष्टी व्हावी,कारण ही पहिला चित्रपट साकारणारे स्व.दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी आहे,नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे,यांच्या प्रयत्नातून नाशिक ही चित्रपट,मालिका निर्मितीस पूरक आहे.येथे रोजगार व पर्यटन वाढावे,यासाठी ही चित्रनगरी व्हावी,याठिकाणी अनेक निर्माते यावे या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे,या कामी
चित्रपट कलावंत,गोदा संवर्धनात सक्रिय चिन्मय उदगिरकर,नामामी गंगा गोदा संवर्धनाचे राजेश पंडित व स्थानिक कलावंतांचे याकामी प्रयत्न सुरू आहे.त्याला यश येत आहे,याला जोडून नव्या दमाचे नाशिकच्या निर्मात्यांना आपली चित्रपट निर्मिती वितरणासाठी ही प्रयत्न झाल्यास अनेकांना रोजगार व त्यांच्या तील अभ्यास केलला वाव मिळेल,

प्रतिक्रिया::-
आनंद पगारे निर्मिती दिग्दर्शक

आनंद पगारे-निर्माता दिग्दर्शक

-पुकार फिल्म प्रॉडक्शनच्या माध्यमातून”सपान सरल”या चित्रपटाची निर्मिती झाली,हा चित्रपट लवकरच सर्वांसमोर येणार आहे,या मराठमोळ्या चित्रपटात गाण्यांत विविधता आहे,ओवी,भिडणारे शीर्षक गीत,परिवर्तन प्रेमगीत,आयटम गीत,यात आहे.उत्तम डिजिटल तंत्रज्ञान वापरून कॅमेरा,साउंड,एडिटिंग असे उत्तम तंत्रज्ञान असलेला हा नाशिकची निर्मिती असलेला मराठमोळा चित्रपट सामान्य शेतकऱ्यांची सामान्य शासकीय योजनेसाठी होणारी धडपड,व त्यात त्याने गमावलेले स्वास्थ्य व त्याच होणारं विस्थापन यावर या चित्रपटात प्रकाश टाकलेला आहे.

प्रतिक्रिया::-
राम खुर्दळ (कलाकार):-

राम खुर्दळ,कलाकार

दरम्यान मराठी चित्रपटनिर्मितीच वेड असणारे नवखे मंडळींना नाशिकमध्ये खुप संधी आहे,मात्र त्यांना योग्य दिशा व संधी देणाऱ्या संस्था,आर्थिक मदत मिळवण ही कसरत आहे.या चित्रपट निर्मितीत एक्सपर्ट असलेले मात्र परिस्थितीने गाजलेले निर्माते, कलाकार मंडळीना ही हाच अनुभव आहे.मात्र सपान सरल या मराठी चित्रपटाचा एक भाग म्हणून मला वाटते की,आम्ही ज्या परिस्थितीत हा चित्रपट साकारला ती मोठी कसरत होती,चित्रीकरणासाठी निर्मितीसाठी लागणारा खर्च उभे करणे अवघड परीक्षाच असते,मात्र जिद्द व ध्येयाने प्रेरित त्या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही ही धडपड पूर्णत्वास नेली,आता हा पूर्णत्वास आलेला चित्रपट समाजासमोर आणण्यासाठी चित्रपट वितरक शोध सुरू आहे.हे क्षेत्र वाढवायचे, तर नाशिकमध्ये खूप ग्रोथ आहे,गरज आहे.या मंडळींना साहाय्य देण्याची,त्यांच्यातील गुणांना पुढे नेण्याची.