उडाली खळबळ , लोकात चर्चा ,
अमीन शाह ,
रवी जाधव
रेतीचा टिप्पर पकडून तो सोडून देण्यासाठी ५० हजार मागून ३५ हजार रुपये स्वीकारणारा देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचा पोलीस जमादार संजय देविदास चवरे ( ४० ) याला बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या खाजगी साथीदारां सह अटक केली आहे ही कार्यवाही देऊळगाव मही येथील पाबळे मोटर्ससमोर करण्यात आली . चवरे याच्यासह त्याचा खाजगी मित्र दत्तात्रय उर्फ सोनू भिमराव शिंगणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे रेती वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या नारायणखेड ( ता . देऊळगाव ) येथील २३ वर्षीय तरुणाने या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती . या तरुणाचा वाळूने भरलेला टिप्पर पोलीस नाईक चवरे याने पकडला होता . मात्र कोणतीही कारवाई न करता टिप्पर सोडूनही दिला होता . त्याचा मोबदला म्हणून त्याने खासगी व्यक्ती दत्तात्रय शिंगणे याच्यामार्फत ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती .
या तील ३५ हजार रुपये चवरे याने स्वीकारले. त्याचवेळी सापळा रचून बसलेल्या “ एसीबी’च्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली . त्याच्याकडून ३५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत . ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत , बुलडाणा “ एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ महादेव चव्हाण , पो.ना. विलास साखरे , पोलीस शिपाई अझरुद्दीन काझी यांनी केली .