⚫ नियमानुसार कायदेशीर कारवाई करुं – ठाणेदार विनोद चव्हाण.
अयनुद्दीन सोलंकी,
———————-
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिची उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार यांनी मासीक सभेच्या ग्रामपंचायत ठरावावर सरपंच नसतांना, सरपंचाचा खोटा व बनावट रबर स्टॅम्प मारुन सही करून शासनाची फसवणुक करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याची लेखी तक्रार पारवा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
विशेष म्हणजे शनिवारी सरपंच वर्षा कणाके हिची तक्रार पारवा पोलीसांनी घेण्यास नकार दिल्याने तिने पोलीस अधीक्षक यवतमाळ व पारवा पोलीस स्टेशन येथे रजिष्टर पोष्टाने तक्रार दाखल केली आहे. या मुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
दरम्यान, चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश भगवान नडपेलवार विरुद्ध यापुर्वी कुर्ली येथील कंट्रोल डीलर शेख शमा शेख ईकबाल हिला संगणमत करुन 6 हजार रुपयांची खंडणी मागीतल्या प्रकरणी घाटंजी न्यायालयाच्या आदेशावरुन भादंवि कलम 384, 389, 506 व 34 नुसार पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर प्रकरण घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे, हे विशेष.
घाटंजी तालुक्यातील वर्षा भिमराव कणाके ही चिखलवर्धा येथील आदिवासी महीला राखीव ग्रामपंचायत सरपंच आहे. 10 मार्च रोजी चिखलवर्धा येथील ग्रामपंचायतची मासीक सभा सरपंच वर्षा कणाके हिच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात चिखलवर्धा येथील गावात ठक्कर बाप्पा योजनेतून सिंमेट काँक्रिट रस्ता व नालीचे बांधकाम करण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला. परंतु, सदरचा ठराव सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आलेला असतांना उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी सदरचा ठराव ग्रामसेवक पी. सी. दौड यांच्या हस्ताक्षरात तयार करून स्वतः उपसरपंचाने तथाकथित ठरावावर उपरसरपंचाचा रबरी शिक्का मारून त्यावर सरपंच म्हणून स्वतःची सही केली. रबर स्टॅम्प वर असलेला ‘उप’ हे शब्द पेनने खोडतोड करण्यात आले. तसेच ठरावाच्या डाव्या बाजूला ग्रामसेवक दौड यांचा सही व शिक्का मारण्यात आला.
चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके, ग्रामपंचायत सदस्य कुसुम चव्हाण व सदस्य योगीता आत्राम हे तिघेही 14 सप्टेंबर रोजी सकाळी चिखलवर्धा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने जात होते. तेवढ्यात उपसरपंच आकाश नडपेलवार हा प्राथमिक मराठी शाळेजवळुन बस स्टँड कडे जातांना दिसला. तेवढ्यात सरपंच वर्षा कणाके हीने त्याला थांबवून पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात 10 मार्च रोजीच्या दाखल केलेल्या ठरारावर सरपंच नसतांना, सरपंचाची खोटी सही व खोटा व बनावट रबर स्टॅम्प कां मारला अशी विचारणा केली असता, उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी सरपंच कणाके हिला जातीवाचक शिवीगाळ करून तुझ्याशी जे होते ते खरं म्हणुन आदिवासी समाजाला अपमानीत करुन धमकी दिली. अशा आशयाची लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यवतमाळ व पारवा पोलीस ठाण्यात दाखल करुन उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी सरपंच वर्षा कणाके हीने केली आहे.
————————————-
➡️ पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता. चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा कणाके यांची उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक दौड यांचे विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात रजिष्टर पोष्टाने लेखी तक्रार प्राप्त झालेली आहे. सदर तक्रारीवरुन कायदेशीर बाबी तपासून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी पोलीसवाला आँनलाईन मिडीयाशी बोलतांना सांगितले.