Home अकोला लहान चिमुकल्यास हवस का शिकार बनविणाऱ्या वृद्ध आजोबास जन्मठेपेची शिक्षा ,

लहान चिमुकल्यास हवस का शिकार बनविणाऱ्या वृद्ध आजोबास जन्मठेपेची शिक्षा ,

351

 

 

अमीन शाह

 

अकोला ,

मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावामध्ये साडेचार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय आजोबाला पोस्कोच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे . सोबतच अडीच लाख रुपये दंडही ठोठावला आहे . दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे . सदर घटना 24 जुलै 2019 रोजी घडली होती . विठ्ठल मारुती पारिसे ( 75 ) असे आरोपीचे नाव आहे . माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या एका गावामध्ये एक चार वर्षाचा मुलगा हा घराबाहेर खेळत होता . त्याच्या शेजारी राहणारा विठ्ठल मारुती पारीसे याने त्या मुलाला चॉकलेटचे आमिष देऊन घरात बोलावले . त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला . त्याच वेळी तेथे वर्गणी मागण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी घरात कोणी आहे का , यासाठी आवाज दिला . घरातून उत्तर येत नसल्यामुळे त्या महिलांनी दरवाजा लोटून आत डोकावून पाहिले . त्या महिलांना विठ्ठल पारिसे हा त्या मुलावर अत्याचार करीत असल्याचे त्यांना दिसले . या दोन महिलांना पाहून पीडित बालक हा रडत घरी पळत गेला . तसेच त्या दोन महिलांनी पण त्या पीडित बालकाच्या आईला संबंधित घटना सांगितली .
पीडित मुलाचे वडील रात्री घरी आल्यानंतर त्यांनी 25 जुलै 2019 रोजी माना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली . पोलिसांनी यामध्ये भादंवी कमल 377 , पोस्को 3 , 4 , 5 , आणि कलम 7,8,9 नुसार गुन्हा दाखल केला . माना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय खंडारे आणि पोलिस उपनिरीक्षक विजय महाले यांनी यामध्ये तपास केला . यामध्ये विठ्ठल पारिसे यास अटक केली आहे . तेव्हापासून तो कारागृहात होता . या प्रकरणी पोस्कोच्या विशेष न्यायालयमध्ये प्रकरण सुरू होते . न्यायालयाने यामध्ये आठ साक्षीदार तपासले . एकही साक्षीदार फितूर झाला नाही . विशेष न्यायालयाने कलम 377 मध्ये जन्मठेप आणि एक लाख रुपये दंड तसेच पोस्को 3 , 4 , 5 मध्ये जन्मठेप व एक लाख रुपये दंड तसेच कलम 7 , 8 , 9 मध्ये पाच वर्षे शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे . दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे . दंडातील अर्धी रक्कम ही पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे . या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ऍड . मंगला पांडे यांनी युक्तिवाद केला