Home नांदेड आ.भीमराव केराम पुढील आठवड्यात माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर.

आ.भीमराव केराम पुढील आठवड्यात माहूर तालुक्याच्या दौऱ्यावर.

220

मजहर शेख,नांदेड

नांदेड/किनवट, दि, २३ :- किनवट/माहूर विधानसभा मतदार संघाचे आ.भीमराव केराम हे पुढील आठवड्यात माहूर तालुक्याचा जनसंपर्क दौरा करणार असल्याची माहीती त्यांच्या कार्यालयाने कळविली आहे.
माहूर तालुका संपर्क दौऱ्यात आ.भीमराव केराम हे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यां समवेत सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या अडिअडचणी जाणून घेणार आहेत. याच दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध विकास कामाचा शुभारंभही करण्यात येणार असल्याची माहीती किनवट कार्यालयाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून कळविली आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या अटी/शर्थीमुळे व घालून दिलेल्या नियमांमुळे ईच्छा असतांनाही आपल्याला विधानसभा क्षेत्रात फिरता आले नाही.आमदार भीमराव केराम
येत्या सोमवार पासून माहूर तालुक्यातील जनतेचे निवेदन स्वीकारण्यासाठी व त्यांच्या तक्रारी,अडीअडचणी जाणून त्याचे निराकरण करण्यासाठी माहूर भाजपा कार्यालयात आमदार जनसंपर्क कैम्प राहणार असून येथे स्वीय सहायक श्री प्रकाश कुड़मते हे आमदार केराम यांचे वतीने निवेदन, तक्रार स्वीकारतील . तरी सर्व बांधवा ना आपल्या अडचणी येथे संपर्क करून मांडावे दर15 दिवसांनी आ.भीमराव केराम हे जातीयेने संपर्क कार्यालयात भेट देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.असे आमदार जनसंपर्क कार्यालयाचे वतीने प्रसिद्धि पत्रकात नमूद केले आहे