Home विदर्भ अळणगांव येथे विक्रमी ९२ टक्के कोरोना लसीकरण

अळणगांव येथे विक्रमी ९२ टक्के कोरोना लसीकरण

457

धनराज खर्चान – भातकुली

अमरावती – खॊलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या ग्राम अळणगांव प्राथमिक उपकेंद्र येथे विक्रमी ९२ टक्के कोरोना लसीकरण झाले आहे .

अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपेरवायजर यांनी पोलीसवाला ऑनलाइन मिडियाशी बोलताना दिली.अळणगांव येथे जून ते सप्टेंबर या चार माहिन्याच्या कालावधी मध्ये एकूण आठ टप्प्यामध्ये १८ ते ६० च्या वर वयोगटातील , कोव्हिलशिल्ड या लसीचे संपूर्ण आतापर्यंत झाले. गावातील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाडून कोरोना लसीकरणाला प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, त्याचे मुख्य कारण मागील दीड वर्षांपासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अळणगांव येथील आरोग्य टीम व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच ग्रामपंचयात कर्मचारी व पोलीस पाटील सदैव आपल्या कार्यात तत्पर असल्याचे दिसून आले .त्याच बरोबर गावातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात साथ दिली, अशाप्रकारे प्राथमिक आरोग्य टीम व गावातील जागृत नागरिकामुळे एवढया मोठ्या प्रचंड प्रमाणात लसीकरण झाले.कदाचित भातकुली तालुक्यातच नव्हे अमरावती जिल्ह्यात अळणगांव हे एकमेव गाव होऊ शकते कि एवढे मोठे कोरोना लसीकरण येथे झाले , या कार्यक्रमाला उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुपरवायजर सुलतान साहेब,CHO खोंडे मॅडम, आरोग्य सेविका मकेश्वर मॅडम , आरोग्य सेवक कुडमेथे सर, मदतनीस संगीत चव्हाण ,आशा वर्कस कल्पना ढवळे , अंगणवाडी सेविका मेटांगे मॅडम, ग्रामपंचायत शिपाई सुनीलभाऊ अब्रूक, गावचे पोलीस पाटील हरगोविंदजी इंगळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते,सुलतान साहेब यांनी गावातील सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी पोलिस पाटील व गावातील नागरिकांचे एवढा मोठ्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद आभार व्यक्त केले. तसेच जी आठ टक्के लोक राहिले आहेत, त्यांनीही लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे कारण त्यांना भविष्यात कसल्याही प्रकारची बाहेर जाताना अडचण येऊ नये अशी विनंती सुद्धा केली.