Home वाशिम मंगरुळपीर शहरात दिवसाढवळ्या तोडलेल्या ‘त्या’ वृक्षाबाबत अजुनही कारवाई नाही

मंगरुळपीर शहरात दिवसाढवळ्या तोडलेल्या ‘त्या’ वृक्षाबाबत अजुनही कारवाई नाही

365

‘ट्रि कटींग,झाली का सेटिंग?’

 

झाड तोडायला सांगणार्‍यासह सबंधित दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

मंगरूळपीर येथे राजरोस करत आहेत पर्यावरणाची हानी

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरातील बॅंक आॅफ इंडियाच्या शाखेजवळील परिसरात असणारे महाकाय झाड दिवसाढवळ्या तोडल्या गेले.न.प.प्रशासनाला माहीती होताच तात्काळ घटनास्थळी जावुन पंचनामा केला आणी सबंधित दोषींवर गुन्हे करन्यासाठी मंगरूळपीर पोलिस स्टेशनला पञही दिले परंतु अद्यापपर्यत कोणतीही कारवाई न झाल्याने ऊलटसुलट चर्चा होत असुन झाड तोडायला सांगणार्‍यासह सबंधित दोषीवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता होत आहे.
मंगरुळपीर शहरातील राठी कलेक्शन व पुष्पांजली कापड केंद्रा समोर असलेल्या जागेवरील महारुख या विशाल वृक्षाची 17 सप्टेंबर रोजी भर दिवसा कत्तल करुन शासनाच्या वृक्ष लागवड या योजनेला हडताळ फासण्याचा प्रकार मंगरुळपीर येथे घडला.या विशाल वृक्षाचा कोणालाही कोणताच त्रास नव्हता असे नागरिक बोलत आहेत.उन्हाळ्यात या वृक्षाच्या सावलीचा आधार व थंडावा वयोवृद्धांना मिळत होता. सदर वृक्ष तोडण्यासाठी परवाना घेतला काय? कुणाच्या परवानगीने झाड तोडण्यात आले? कुण्या खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या जागेत हे झाड होते का?असे प्रश्‍न उपस्थित होत आहे. झाडे लावा, झाडेझाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेत शासन प्रचार, प्रसार करत प्रयत्नांची पराकाष्ठा करुन मानव जातीला जागरुक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करुन जनजागृती करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाने सर्वत्र हाहाकार घातल्यामुळे प्राणवायू मिळवण्यासाठी हतबल होत तडफडून रोज जीवच्या जीव गतप्राण होत आहेत.अशी गंभीर परिस्थिती असतानाही मानव जात जागृत व्हायला तयार नसून मंगरूळपीर शहरातच नव्हे तर ग्रामिण भागातही दररोज उभ्या झाडांच्या कत्तलीवर कत्तली होत असून, राजरोसपणे तोडलेल्या लाकडांची उघडपणे वाहतूकही केली जात आहे. असे असतानाही वन विभाग मात्र कुंभकर्ण झोपेत आहे का झोपेचं सोंग घेतेय हा सामान्य माणसाला प्रश्‍न पडला आहे.

 

*अजुनही पोलीसांकडुन कोणतीच कारवाई नाही*
दिवसाढवढ्या झाडाची केलेली कत्तल झाल्याचे कळताच न.प.ने घटनास्थळी जावुन पंचनामा केला.यातील जबाबदार व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात आले.तसेच झाड कापण्याची शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.आणखीन तीन झाड जुन्या स्टँड चे लिजवरील दुकानामागील चोरून कापण्यात आले त्याबाबत चौकशी करून पोलिसांना माहीती देण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत.परंतु अद्यायही पोलिसांकडुन कुठलीही कारवाई करण्यात आली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

*तर झाड वाचले असते……..?*
महाकाय वृक्षाची कत्तल होत असतांना काहीजनांना आढळले,कापन्याच्या आधीपासुन तर वृक्ष धाराशाही होईपर्यत व प्रशासकिय यंञणा स्पाॅटवर पंचनाम्यासाठी येइपर्यत या घटनेचे काहींनी व्हिडिओ शुट केले.जर तो वृक्ष कापायच्या आधीच कापणाराला विनंती करुन रोखले असते किंवा न.प.प्रशासनाला तसेच पोलिसप्रशासनाला तात्काळ कळवले असते तर ते झाड वाचले असते.घटना घडल्यावर गाजावाजा केल्यापेक्षा घटना घडुच नये यासाठी प्रयत्न करायला हवे होते अशी खंतही वृक्षप्रेमिंनी व्यक्त केली आहे.

*ट्रि कटिंगमध्ये सेटिंगची जोरदार चर्चा?*
महाकाय वृक्ष दिवसाढवळ्या कापल्याचे कळताच प्रशासन घटनास्थळी पोहचले आणी पंचनामा केला.या प्रकरणी कोणतीही कारवाई होवु नये म्हणून काहींना हाताशी धरुन सेटिंग केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु अाहे.असे जर दिवसाढवळ्या पर्यावरणाची हानी कुणी करत असतील तर दोषींना सबंधित प्रशासनाने अभय देवु नये अशी मागणी होत आहे.

*चंदनचोरांनाही शोधन्यात पोलिसांना अपयश?*
काही दिवसापुर्वी मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालय आवारातील जुने चंदनाचे झाड अज्ञाताने कापुन नेल्याची घटना घडली होती.पंचायत समिती कार्यालयाकडुन गुन्हा दाखल करण्यासाठी पो.स्टे.ला पञही दिल्याचे सांगीतले होते.परंतु त्या प्रकरणातील गुन्हा नोंद झाला का?याविषयी कळू शकले नाही.पोलिसांना त्या चंदनचोरांना शोधन्यातही अजुन यश आलेले दिसत नाही.याआधीही मंगरुळपीर तालुक्यात बर्‍याच जनांच्या शेतातील,कार्यालयातील जुने चंदनाचे झाडे कापुन नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.ही चंदनचोरांचीही टोळी असु शकते त्यामुळे पोलीसांनी याप्रकरणी छडा लावावा अशी मागणीही होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206