Home वाशिम पुरावा शिल्लक नसतांनाही छडा लावुन दोघ आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

पुरावा शिल्लक नसतांनाही छडा लावुन दोघ आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

263

 

स्थानिक गुन्हे वाशिम आणि पोलीस स्टेशन जऊळका यांची संयुक्त कारवाई

दुहेरी खुनाच्या गुन्हयातील दोन आरोपी केले गजाआड

फुलचंद भगत
वाशिम:-स्थानिक गुन्हे शाखेच्या शिलेदारांनी पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा ‘द ग्रेट’ कामगिरी केली असुन दुहेरी खुणातील आरोपींना कुठलाही पुरावा शिल्लक नसतांना मोठ्या शिताफिने छडा लावुन दोन आरोपिंना मुंबई येथुन अटक केली आहे.या कामगिरीमुळे वाशिम पोलीसदलाची पुन्हा एकदा अभिमानाने मान उंचावली असुन जनमाणसातही कौतुक होत आहे.
दिनांक १९/०९/२०२१ रोजी फिर्यादी नामे प्रमोद गजानन निबाळकर वय ३० वर्षे रा.डव्हा यांनी
फिर्यादी दिली की, त्यांचे वडील गजानन गोविंदराव निंबाळकर वय ६० वर्षे यांना कोणीतरी अज्ञात इसमाने
गळयाला फाशी लावुन डोक्यात धारधार शस्त्राने मारहाण करुन गंभीर जख्मी करून ठार मारले तसेच त्यांची
आई निर्मला गजानन निबाळकर वय ५५ वर्षे हिचा सुध्दा अज्ञात कारणामुळे मृत्यु झालेला आहे.मा. पोलीस उप महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांचे आदेशाने तात्काळ सोमनाथ जाधव पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकास गुन्हयाचा छडा लावण्याबाबत आदेशित केले. पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव यांनी त्यांची वेगवेगळी तिन पथके तयार केली. आणि तात्काळ त्यांचे पथकास गुन्हयाचा छडा लावण्याबाबत आदेशित केले.तांत्रिक बाबींचा आधार घेऊन तसेच गोपनिय माहितीच्या आधारे घटना घडल्यापासुन गावातील दोन इसम अचानक गावातुन निघुन गेल्याचे समजले. ते दोन्ही इसम मालेगाव येथुन ट्रव्हल्स ने मुंबई येथे गेल्याचे समजल्याने ट्रॅव्हल्सचे चालकाकडे विचारपुर केल्यानंतर त्यातील एक इसम दिलीप गोपाल रत्ने (चव्हाण) वय ३४ वर्षे रा. डव्हा बोरीवली येथे उतरल्याचे समजले. त्याच्याकडे कोणताही मोबाईल नसताना त्याचा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबई येथे रवाना झाली. मुंबई येथील त्याचे सर्व नातेवाईकांचा शोध घेत स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने दिलीप गोपाल रत्ने (चव्हाण) वय ३४ वर्षे रा डव्हा हयास वसई येथुन शिताफिने
ताब्यात घेतले. आरोपी दिलीप गोपाल रत्ने यांनी त्यांचे याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा
साथिदार विकास याचे सह गुन्हयाची कबुली दिल्याने दुसऱ्या पथकाने डव्हा येथुन विकास शंकर राठोड वय २७
वर्षे या ताब्यात घेतले.वरील दोन्ही आरोपी १) दिलीप गोपाल रत्ने (चव्हाण) वय ३४ वर्षे रा डव्हा व २) विकास शंकर राठोड वय २७ वर्षे रा डव्हा याना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन यांचे आणखी काही साथीदार यांचे सहभागा बाबत पुढील तपास सुरु आहे.सदर कारवाईत मा. पोलीस उप महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनात मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक श्री.गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे,पोलीस निरिक्षक सोमनाथ जाधव,सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल मोहनकर,प्रमोद इंगळे, विजय
जाधव, पोउपनि शब्बीर पठाण स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, ठाणेदार सपोनि आदिनाथ मोरे, पोउपनि गोरे पोस्टे जऊळका ,स्थानिक गुन्हे शाखा येथील अमलदार पोना किशोर चिंचोळकर, सुनिल पवार,राजु राठोड, अमोल इंगोले,प्रशांत राजगुरु,पोशि राजेश गिरी,संतोष शेणकुडे,प्रविण राऊत,दिगंबार मोरे, चालक श्याम इंगळे, मिलींद गायकवाड, संदीप डाखोरे, पोस्टे जऊळका पोना काळदाते, पोशि कावरखे दाभाडे,जंजाळ तसेच सायबर सेल
दिपक घुगे,गोपाल चौधरी, महेश वानखेडे यांनी मोलाची कामगिरी बजावली.

*पुरावा नसतांनाही तांञीक बाबींचा आधार घेवुन लावला छडा*
नेहमिच शिताफिने काम करुन अनेक गुन्हेगारांना जेरबंद करणार्‍या वाशिमच्या स्थानिक गुन्हेशाखेला डव्हा येथील प्रकरणाचे नव्याने आव्हाण आले.आरोपिने कुठलाही पुरावा शिल्लक न ठेवता सदर खुन केले.परंतु पुराव्याची वाट न बघता तांञीक बाबींचा आधार घेत तसेच मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे तपास करुन शिताफिने दोन्ही आरोपिंना मुंबईतुन जेरबंद केले.या पोलिस विभागातील शिलेदारांच्या ऊल्लेखनिय कार्याबद्दल सर्वञ कौतुक होत आहे.

*मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे प्रकरणाचाही छडा लावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे शिलेदार*
मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे या गावापासुन एक कि.मि.अंतरावर दि.१२ रोजी एका अनोळखी इसमाची बंदुकीची गोळी झाडुन खुन झाल्याची घटना घडली होती.याही प्रकरणाचा वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची एसपी यांच्या मार्गदर्शनात तपास करुन छडा लावला आणी सदर आरोपिला नागपुर येथुन अटक केलि.अशा महत्वपुर्ण तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यत ऊल्लेखनिय कामगिरी बजावली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206