Home उर्दू आसिम खानने मिळवले युपीएससी परीक्षेत घवघवीत यश ,

आसिम खानने मिळवले युपीएससी परीक्षेत घवघवीत यश ,

551

 

देशातून ठरला एकमेव विद्याथी  ,

देशात 558 वा रँक ,

उर्दू भाषेत झाले शिक्षण

अमीन शाह

धुळे , उर्दु भाषेतून शालेय शिक्षण पूर्ण करणारे खान आसिम किफायत खान यांनी युपीएससी -2021 परीक्षेत यश मिळवले आहे . भारतात 558 रैंक मिळवत आसिफने यश मिळवले आहे . विशेष म्हणजे या युवकाचे संपूर्ण शिक्षण उर्दू भाषेत झाले आहे . युपीएससी परीक्षा पण त्याने उर्दू भाषेत दिली आहे . ते आपल्या देशात युपीएससी परीक्षा देणारे पहीले विद्यार्थी ठरले आहेत . यापूर्वी ते मुलाखतीसाठी पात्र ठरले होते पण अंतिम सेलेक्शन झाले नव्हते . पण यावेळी त्यांनी अंतिम यादीत स्थान मिळवले . आसिम यांनी हज कमेटी ऑफ इंडियाच्या IAS academy मधून प्रशिक्षण घेतले . औरंगाबाद येथील काविश फाऊंडेशनचे पण त्याला मार्गदर्शन लाभले आहे अशी माहिती मिळाली आहे . सर्व स्तरातून आसिफचे अभिनंदन केले जात आहे .