Home महत्वाची बातमी नेहमी गजबजलेल्या डी , पी , रोड सह चिखली शहरातील रस्त्यांनी घेतलं...

नेहमी गजबजलेल्या डी , पी , रोड सह चिखली शहरातील रस्त्यांनी घेतलं मोकळं श्वास ,

446

ठाणेदार अशोक लांडे एक्शन मोड मध्ये ,

प्रा , तंजीम हुसेन

चिखली ,

येथे ठाणेदार अशोक लांडे यांनी चिखली पोलीस ठाण्याचा पदभार घेताच आपल्या वेगळ्या शैली मध्ये कार्यास सुरवात केली असून गेल्या अनेक वर्षांपासून येथील मुख्य मार्ग डी , पी , रोड वर मध्य भागी लागत असलेल्या दुकानं मूळे व बेशिस्त वाहना मुळे या रस्त्याचा श्वास कोंडला होता सोमवार च्या दिवशी आठवडी बाजार मुळे या रस्त्यावर वाट काढत जावे लागत होते मात्र आज सर्व मध्य भागी असलेली दुकाने रोडच्या दोन्ही बाजूस लागत असल्या मुळे या रस्त्याने मोकळं श्वास घेतला आहे ,

व्यापारी आनंदित ,

याच डी , पी , रोडवर मोठं मोठी दुकाने आहेत यात कापड कृषि ज्वेलर्स दवाखाने , मेडिकल आहेत रस्त्यावर मध्यभागी लागणाऱ्या दुकाना मुळे या वयवसायिकांच्या व्यसाया वर परिणाम झाला होता रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी अनेक वेळा त्या दुकानदारांनी केली होती डी , पी , रोडने मोकळा श्वास घेतल्या मूळे या दुकानदारांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत ,

बेशिस्त वाहन चालक ,

डी , पी , रोड सह शहरातील सर्वच रस्त्यावर अनेक वाहन धारक आपली वाहने कुठे ही लावत आहेत त्या मुळे रहादरीस अडथळा निर्माण होत आहे त्या मुळे वाहन धारकांनी आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंग मध्येच उभी करावी अन्यथा अश्या बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याचे चिखलीचे नवं नियुक्त ठाणेदार अशोक लांडे यांनी सांगितले ,