Home विदर्भ तळेगांव मध्ये धाडसी चोरी, शटर तोडून केली चोरी

तळेगांव मध्ये धाडसी चोरी, शटर तोडून केली चोरी

188

रवि साखरे

वर्धा /  तळेगांव शा पंत  – येथे हायवेलगत असलेल्या इकॉम एक्सप्रेस या ऑनलाईन डिलीव्हरी करणाऱ्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे आहे. 

 दिनांक 27/09/2021 रोजी सकाळी 07.15 वा. दरम्यान अंतोरा येथून फिर्यादी  तळेगांव येथे ईकॉम कंपनीचे ऑफीस उघडण्यासाठी आल्यावर ही घटना उघडकीस आली. तेव्हा कर्मचारी हे ऑफीसचे कुलूप उघडण्यासाठी गेला असता त्याला इलेक्ट्रीक मिटर लावले त्या बाजूचे शटरचा कोपरा बाहेरच्या बाजूने थोडा वाकवलेला दिसला. म्हणून फिर्यादीनी   वरिष्ठांना याबाबत सांगितले की व पोलीसांना फोन द्वारे माहिती दिली तेव्हा तिथे पोलीस आले. नंतर पोलीसा समक्ष फिर्यादीजवळ असलेले चावीने शटरचे चार लॉक उघडून आतमध्ये ऑफीसचे केज लॉकर मध्ये ठेवलेले पॉर्सल शॉपीगचे एकूण 2,51,089 रू ची पाहणी केली असता केज लॉकरची पट्टी तोडून गोदरेज लॉकरसह त्यामध्ये असलेले नगदी 2,51,089 रू व ऑफीस मध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज चे DVR कि. अंदाजे 4,000 रू असा एकूण 2,55,089 चा माल मध्य रात्री दि. 26/09/2021 चे सायंकाळी 22 / 15 वा. ते दि. 27/09/2021 चे 07/15 वा दरम्यान कोणत्यातरी अज्ञात इसमांने कोणत्यातरी लोखंडी जड वस्तूने लोखंडी शटर वाकवून ऑफीसमध्ये प्रवेश करून चोरून नेल्याचे दिसले. ऑफीसमध्ये आलेले इतर सिलबंद असलेले पार्सल बरोबर दिसले व लोखंडी कपाट सुध्दा ज्या परिस्थितीत होते त्याच परिस्थीत दिसले. झालेल्या घटने सबंधाने पोलीसांनी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आजुबाजुच्या परिसरात शोध घेवुन शहानिशा केली. पुढील तपास आर्वी उपविभागीय  पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष गजबिये ,psi पवन भांबुरकर psi हुसेन शहा ,मंगेश मिलके ,अनिल ढाकणे ,करीत आहे*तळेगांव मध्ये धाडसी चोरी, शटर तोडून केली चोरी