अमीन शाह ,
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तहसीलमधील एका गावात पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक महिला तांत्रिक, एक पुरुष आणि महिलेच्या पतीला अटक केली आहे. टेंभूर्णी पोलिसांनी सांगितले की पतीला विश्वास होता की असे केल्याने त्याला काही गुप्तधन सापडेल.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या सुरुवातीला मौजे डोणगाव गावात घडलेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
संतोष पिंपळे (40), जीवन पिंपळे, दोघेही डोणगावचे रहिवासी आहेत, तर महिला तांत्रिक राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसीलची रहिवासी आहे. संतोषला दारू पिण्याची सवय होती. पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, तो आपला बहुतेक वेळ गावातील स्मशानभूमीच्या आसपास घालवत असे आणि पत्नीला सांगत असे की, लवकरच त्याला गुप्तधन सापडेल.
’22 सप्टेंबरच्या रात्री संतोषने एक महिला तांत्रिक त्याच्या घरी गुप्तधन शोधण्यासाठी आणले असता त्याने काही विधी केल्यात. दुसऱ्या दिवशी, संतोषने त्याची पत्नी सीमाला सांगितले की तो खजिना शोधण्यासाठी तो मानवी बळी यज्ञास अर्पण करणार आहे. त्याने तिच्यावर काही विधी करण्यास सुरुवात केली आणि जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने तिला मारहाण केली.
नंतर, महिलेने काही ग्रामस्थांना तिच्या पतीच्या प्रकाराबद्दल सांगितले, ज्यांनी तिच्या वडिलांसह पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली.
विरोध केल्यानंतर संतोषने त्यांना मारहाण केली. तुझा बळी देऊन गुप्तधन काढतो, असे संतोष म्हणताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर त्यांचा मुलगा, शेजारील नागरिकांनी धाव घेऊन त्यांची सुटका केल्याची तक्रार सीमा पिंपळे यांनी २३ सप्टेंबर रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार संतोष पिंपळे, जीवन भिका पिंपळे व मांत्रिक महिलेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३ (१) (ख), ४ सह कलम ३२३, ४०५, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाच्या डोक्यावर, मुलीच्या पायावर ठेवला हात-
मांत्रिक महिला सीमा पिंपळे यांच्या घरी आली आणि पलंगावर झोपलेल्या मुलांजवळ गेली. मुलगा विवेक याच्या डोक्यावर आणि मुलगी श्रावणी हिच्या पायावर हात ठेवला. त्यानंतर घराच्या खांबाला काहीतरी बांधले आणि गुप्तधनाचा उजेड पडला, मला सगळं दिसतंय असे सांगून ती निघून गेली. दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवल्याने त्यांचाही नरबळी देण्याची तयारी होती की काय, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवाय त्या दृष्टीने तपास सुरू आहे.
दोघांना पोलीस कोठडी-
नरबळी देण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संतोष पिंपळे व जीवन पिंपळे या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच मांत्रिक महिलेला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.