Home मराठवाडा हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन किर्तन करणारे ताजोद्दीन महाराज शेख यांनी शरीर...

हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन किर्तन करणारे ताजोद्दीन महाराज शेख यांनी शरीर सोडले

1446

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

सर्व धर्मांची शिकवण शांतीचा मार्ग आहे.राम-रहीम एकच आहे.असा सामाजिक एकात्मतेचा संदेश देवून स्वधर्माचे पालन करीत हिंदू धर्मातील सांप्रदायिक पताका खांद्यावर घेऊन आपल्या अमृततुल्य वाणीतून किर्तनाद्वारे अवघ्या महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण निर्माण करणारे हभप ताजोद्दीन महाराज शेख यांचे सोमवारी ता.२७ रोजी रात्री निधन झाले.हभप ताजोद्दीन महाराज शेख यांचे नंदुरबार जिल्ह्यातील जामोद या ठिकाणी किर्तन सुरू असताना त्यांनी शरीर सोडले . जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी ताजोद्दीन महाराज यांनी किर्तन केले आहे.भादली, कुंभार पिंपळगाव, पिंपरखेड, आसनगाव,खडका,पाडुळी अशा अनेक गावांत अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ताजोद्दीन महाराज यांचे किर्तन झाले आहे.त्यांच्या निधनामुळे सांप्रदायिक क्षेत्रातील किर्तनकार मंडळी, भजनी मंडळ, भाविकभक्त आणि सर्व सामान्य माणसाला दु:ख झाले असून यानिमित्ताने सोशल मीडियावर सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.