Home वाशिम पोषणा सोबत स्त्री जन्माचेही स्वागत करा-संजय जोल्हे

पोषणा सोबत स्त्री जन्माचेही स्वागत करा-संजय जोल्हे

405

 

किशोरी मुलींचे जनजागृतीपर पथनाट्य

फुलचंद भगत

 

वाशिम:-एकात्मिक बाल विकास सेवा योजना कारंजा लाड अंतर्गत पोषण सप्ताह निमित्त दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे धामणी परिक्षेत्रातील खेर्डा येथील अंगणवाडी केंद्रमध्ये पोषण महा निमित्त पौष्टीक खाद्य पदार्थाची पाककृती प्रदर्शनी,बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत स्त्रीजन्माचे स्वागत, पथनाट्य तसेच किशोरवयीना मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय जोल्हे, बालविकास प्रकल्प अधिकारी कारंजा मदन नायक, जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे ,खेर्डा ग्रामपंचायत सरपंच येवले, व पर्यवेक्षिका सुरेखा बोळे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच महिला किशोरवयीन मुली यांना आहाराबरोबरच श्री जन्माचे स्वागत सुद्धा करण्यासाठी आपण सदैव तत्पर असले पाहिजे असे सांगितले त्यानंतर किशोरवयीन मुलींनी महिला अत्याचार व बेटी बचाव बेटी पढाव वर आधारित पथनाट्य सादर केले तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्ष लागवड करून करण्यात आले. कार्यक्रम आयोजित करण्याकरिता खेर्डा येथील अंगणवाडी सेविका व धामणी परिक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनिस यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206