Home वाशिम संततधार पावसामुळे पिकांची झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत करुन नुकसान भरपाई...

संततधार पावसामुळे पिकांची झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना सरसकट मदत करुन नुकसान भरपाई त्वरित द्या-फुलचंद भगत

162

 

मंगरुळपीर:- तालुक्यातील अनेक गावात झालेल्या अवकाळी सतधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे, काही भागात शासनाच्या वतीने सर्वेक्षण आणि पंचनामे करण्यात आले आहेत असे दिसते, शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक अवकाळी पावसामुळे निघून गेल्याने आपल्या जिल्ह्यातला तसेच तालुक्यातील शेतकरी निराश झाला आहे, अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचे शासनाच्या वतीने पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी संकटात आल्याचे समजून येत आहे.
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे 40 ते 45 टक्के नुकसान झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे कमी कालावधीत नुकसान भरपाई चे सर्वेक्षण करणे कमी मनुष्यबळा अभावी शक्य नाही. त्या करीता शासनाने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाकडे केली आहे तसेच शेतकरी वर्गातूनही ही मागणी होत आहे.यंदा खरिपाचा पीकविमा अथवा शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी. जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच ओला दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातच अतिरिक्त पाऊस झाला आहे.वाशिम जिल्ह्यात तर इतकी वर्षे दुष्काळ होता. यावर्षी पीकपाणी चांगलं आलं होतं. परंतु परतीच्या पावसाने थैमान घातला असून डोळ्यादेखत सर्व काही वाहून गेलं आहे. सोयाबीन, उडीद, मूग,इ. खरिपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झालेलं आहे. बागायती क्षेत्राला सुद्धा मोठा फटका बसला आहे. पंचनामे करण्यात विमा कंपन्या वेळ मारून नेतील. अनेकवेळा ह्या कंपन्या आपल्यावर अन्याय करत आहेत अशी शेतकऱ्यांमध्ये भावना आहे.आधी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करा. शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचेकडुन करण्यात आली आहे