Home विदर्भ चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार यांच्या अटक पुर्व जामीन अर्जावर जिल्हा व...

चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार यांच्या अटक पुर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावणी..?

352

👉🏿 जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील आरोपी सात दिवसापासून फरार; आरोपी यवतमाळात दडून असल्याची पारवा पोलीसांना दाट शंका..?

अयनुद्दीन सोलंकी,
———————-
घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला उपसरपंच आकाश नडपेलवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमाणित केल्या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (r), 3 (1) (s), भादंवि कलम 504 अन्वये पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी आकाश नडपेलवार यांनी यवतमाळच्या जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भंसाळी यांच्या न्यायालयात सोमवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून सदर प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे. आरोपी आकाश नडपेलवारतर्फे अँड. ए. एम. डाखोरे हे काम पाहत आहे.
सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत करीत असून त्यांना पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण हे तपासात सहकार्य करत आहे.
दरम्यान, चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार हा मागील सात दिवसांपासून फरार असून तो यवतमाळात दडुन असल्याची दाट शंका पारवा पोलीसांनी वर्तविली आहे. तसेच या पुर्वी चिखलवर्धाचे उपसरपंच आकाश नडपेलवार व ईतर तिघें कुर्ली येथील कंट्रोल डीलर शेख शमा शेख ईकबाल हिला संगणमत करुन 6 हजार रुपयांची धमकी देउन खंडणी मागीतल्या प्रकरणी घाटंजी न्यायालयाच्या आदेशावरुन संशयित आरोपी आकाश नडपेलवार, प्रमोद यमसनवार, विलास बडगुलवार व नागोराव कुमरे आदीं विरुद्ध भादंवि कलम 384, 389, 506 व 34 नुसार पारवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणात पारवा पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी घाटंजी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न करता, ब वर्गात मोडणारा समरी फायनल सादर केला होता. मात्र, सदर प्रकरण घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) एफ. टी. शेख यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे, हे येथे उल्लेखनीय.
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला उपसरपंच आकाश नडपेलवार व ग्रामसेवक पी. सी. दौड हे दोघेही ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारात सहभागी न करता सरपंच वर्षा कणाके हिचे शिक्के याचे खोट्या पद्धतीने वापर करुन चिखलवर्धा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतले असल्याची तक्रार 5 एप्रिल रोजी सरपंच वर्षा कणाके हीने यवतमाळ येथील जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात केली होती. तथापि, 13 सप्टेंबर रोजी चिखलवर्धा गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने रात्री सरपंच वर्षा कणाके यांचेकडे गावातील काही स्त्री – पुरुष हे गावात पाणी टंचाई असल्याची तक्रार घेऊन आले होते. त्यामुळे 14 सप्टेंबर रोजी सकाळी सरपंच वर्षा कणाके, ग्रामपंचायत सदस्या कुसुम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या योगिता आत्राम हे तिघेही मिळून प्राथमिक मराठी शाळेजवळुन गावात जात होते. तेवढ्यात उपसरपंच आकाश नडपेलवार हा गावातून बस स्टँड कडे जात होता. या वेळी सरपंच कणाके हिने उपसरपंच नडपेलवार यांस चिखलवर्धा येथील प्राथमिक मराठी शाळेजवळ थांबवून तिने पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 10 मार्च रोजीच्या दाखल केलेल्या ठरारावर सरपंच नसतांना, सरपंचाची खोटी सही व खोटा व बनावट रबर स्टॅम्प कां मारला अशी विचारणा केली, त्यामुळे उपसरपंच आकाश नडपेलवार हा चिडून गेल्याने सरपंच वर्षा कणाके हिला सार्वजनिक ठिकाणी जातीवर, जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले. तसेच तुझ्याशी जे होते ते करं म्हणुन अशा आशयाची धमकी दिली. अशी लेखी तक्रार पारवा पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक दिलीप पाटील – भुजबळ यांच्याकडे रजिष्टर पोष्टाने दाखल केली.
———————————-
👉🏿 दरम्यान, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता, चिखलवर्धा येथील उपसरपंच आकाश नडपेलवार यांचे विरुद्ध पारवा पोलीस ठाण्यात अँट्रोसिटी अँक्ट व ईतर कलमानुसार गुन्हा दाखल असुन आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.