Home सांगली तात्या तुम्ही पोलिस अधिकारी आहात हे कधी जाणवलच नाही….!

तात्या तुम्ही पोलिस अधिकारी आहात हे कधी जाणवलच नाही….!

152

 ता.तासगाव जि.सांगली येथील राजाराम पाटील ( तात्या ) पोलिस दलातील संत माणूस म्हंटलं तरी वावग ठरणार नाही.आज निवृत्तीचा शेवटचा दिवस पण कुठलाही बडेजाव न करता आज सकाळी अंजनी येथील घरी आईला पोलिस दलातील मानाचा सॅल्युट केला.धन्य ती माऊली पुञ असावा ऐसा ज्याचा ञिलोकी झेंडा.

 जो व्यक्ती जिवनात चारिञ्याला,प्रामाणिकतेला व नम्रतेला जपतो त्यालाच जिवनात कौंटुबिक सुख लाभते. खर तर पोलिस दलाचे ब्रिदवाक्य असलेल्या “सदरक्षणालय खलनिग्रहानलय “या वाक्याप्रमाणे तात्या  जवळपास ३२ वर्षे निष्कलंक ,विनम्र,चारित्र्यवान राहिले.

               ज्यावेळी तात्यांचे सख्खे भाऊ आर. आर पाटील (आबा ) राज्याचे उपमुख्यमंत्री ,गृहमंत्री अशा महत्त्वाच्या पदावर काम करत होते त्यावेळेस या अवलियाने आपला कोणताही बडेजाव व रुबाब न करता पोलिस दलातील साईड पोस्टवर काम केले. गरीबीची चटके सोसलेल्या तात्यांनी पोलिस अधिकारी म्हणून आपल्या धार्मिक व अध्यात्मिक स्वभावामुळे परिस्थीतीमुळे घडलेल्या अनेक गुन्हेगारी पार्श्वभुमिच्या अनेक वाल्यांना वाल्मिकी केली. तात्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना सरकारकडून दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.

         तात्या आज आपल्या ३२ वर्षाच्या खाकी वर्दीच्या सेवेतून निवृत्त झाले मात्र ज्या आईने रक्ताचे पाणी व हाडाची काडे करून केलेल्या कष्टातून तात्यांना घडविले त्या आईस आज सकाळी सॅल्यूट करत त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली ही संस्काराची शिदोरी त्यांच्या आजवरच्या कामाच्या पोहचपावती आहे.तात्यांच्या पुढील कार्यास आमच्या मनःपुर्वक शुभेच्छा !

Sandip Patil Darandale.

National president-Satyamev jayate foundations Medical cell.