Home वाशिम स्टोरीमिरर आयोजित ‘स्त्री शक्ती’ स्पर्धेत महाराष्ट्रातून कथा लेखन स्पर्धेत मिनाक्षी नागराळे ठरल्या...

स्टोरीमिरर आयोजित ‘स्त्री शक्ती’ स्पर्धेत महाराष्ट्रातून कथा लेखन स्पर्धेत मिनाक्षी नागराळे ठरल्या विजेत्या ,

463

 

फुलचंद भगत
वाशिम:-स्टोरी मिरर प्रस्तुत संपूर्ण भारत व जगभरातून मराठी भाषेमध्ये ‘स्त्री शक्ती सीजन 2’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नुकताच या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. महाराष्ट्रातून साडेचारशेहून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. वाशीमच्या मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी स्टोरी मिररकडून महाराष्ट्रातून स्त्रीशक्ती कथा लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला.
फेब्रुवारी महिन्यात या स्पर्धेचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात आले होते. मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या ‘तू ही लढ’ या कथेला साडेचारशे महिलांमधून दुसऱ्या क्रमांकाने विजेत्या ठरल्या बद्दल स्टोरी मिरर कडून सुंदर असे सन्मानचिन्ह घरपोच मिळाले. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. हा त्यांच्या लेखणीचा सन्मान आहे. असे मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सर व अंगद दराडे यांनी त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे. यापूर्वीही मीनाक्षी नागराळे यांना गेल्या वर्षीचा ‘ऑथर ऑफ द इयर- 2020’ हा पुरस्कार मिळाला आहे. भारतातला मराठी भाषेसाठी हा पुरस्कार महाराष्ट्रातून मराठी विषयासाठी फक्त तीन जणांना मिळतो. त्यामध्ये तीनही स्त्रियाच विजेत्या ठरल्या होत्या. स्टोरी मिरर या जगभरातून लाखो वाचक असलेल्या एकमेव साइटवर नवोदित लेखकांना खूप छान छान स्पर्धा व बक्षिसे जिंकण्याची संधी असते.
मीनाक्षी मीनाक्षी नागराळे यांनी आत्तापर्यंत कितीतरी पुस्तके व दोनशे रुपयाचे वाउचर्स जिंकले आहेत. ‘ऑथर ऑफ द इयर 2020’ हा पुरस्कार मिळाला. आता कथालेखन स्पर्धेमध्ये स्त्री शक्ती या विषयावर ‘तू ही लढ’ ही द्वितीय क्रमांकाची कथा विजेती ठरल्याबद्दल स्टोरी मिररकडून मिनाक्षी नागराळे यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सरकार मान्य असलेली ही स्टोरी मिरर या वेबसाईटवर जगभरातून लाखो वाचक असलेले एकमेव साईट वर मीनाक्षी नागराळे यांचे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने लिखाण करीत आहेत. त्यांचे लिखाण उत्कृष्ट व दर्जेदार असल्याने स्टोरी मिरच्या साहित्य पोर्टलवर त्यांच्या अनेक कविता, कथा, क्योट्स प्रकाशित असून हजारो वाचकांनी त्यांना त्यांच्या लिखाणाला पसंती दिलेली आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील यशाबद्दल स्टोरी मिरर मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सर व अंगद दराडे सर यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206