पांगरी महादेववासियांचा पेडगाव पं.स. पोटनिवडणुकीवर बहिष्कार
फुलचंद भगत
वाशिम:-गेल्या १८ वर्षांपेक्षा अधिक काळापासून गाव अस्तित्वात आहे. गावकरी आहेत; परंंतु ग्रामपंचायतीच्या सुविधाच नाहीत, ही व्यथा मंगरुळपीर तालुक्यातील पांगरीवासियांची असून, वारंवार विविधस्तरावर मागणी करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याने आता येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सुविधा नाहीत, तर मतदानही नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्याची नांदी म्हणून येत्या ५ आॅक्टोंबर रोजी होणार्या पेडगाव पं.स. गणाच्या पोटनिवडणुकीवर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना १ आॅक्टोबरला पत्रही दिले आहे.
मंगरुळपीर तालुक्यात अतिशय दुर्गम भागांत पांगरी महादेव हे गाव गेल्या अनेक वर्षांपेक्षा अधिक काळापासून वसलेलं आहे. या गावांतील सर्व रहिवासी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. त्यांच्याकडे शेतीही आहे. स्वत:ची घरे आहेत; परंतु हे गाव पंचायतरात व्यवस्थेत नाही. गावाला ग्रामपंचायतच नाही नजीकच्या पाचही गावांनी जोडून घेण्यास यापुर्वीच नकार दिला आहे. ग्रामपंचायतनाही हे गाव जोडलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सुविधापासून हे गाव वंचित असल्याने विकासापासूनही वंचित आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून येथील गावकरी ग्रामपंचायतचा दर्जा मिळविण्यासाठी धडपडत आहेत. यासाठी जिल्हा परिषदस्तरावरून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात वारंवार त्रुटी काढण्यात आल्या; परंतु ग्रामस्थांच्या अडचणींचा विचार करून ग्रामपंचायतचा दर्जा देण्याची तसदी शासनाने घेतली नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांत रोषाचे वातावरण आहे. आता ग्रामपंचायतीच्या सुविधा नाही, तर मतदानही नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याची नांदी म्हणून येत्या ५ आॅक्टोबर रोजी होणाºया पेडगाव पं.स. गणाच्या पोट निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे पत्रच त्यांनी १ आॅक्टोंबर रोजी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना दिले आहे.