Home मराठवाडा प्रहार युवती आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी पायल काठोले

प्रहार युवती आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी पायल काठोले

301

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

राज्यमंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांचे राजकीय आस्तित्व व सामाजिक विचारावर आधारित प्रहार जनशक्ती पक्षा अंतर्गत प्रहार महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे यांनी कु.पायल संजय काठोळे या युवतीची नियुक्ती पत्र देऊन प्रहार युवती आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी कवडगावच्या सरपंच मनिषाताई विष्णु वादे /जाधव यांच्या हस्ते कु.पायल काठोले या युवतीचा केक कापून वाढदिवस साजरा केला.तसेच युवती जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. 

यावेळी प्रहार महीला आघाडीच्या प्रीती देशमुख,रंजना पवार,पुनम पाटील,वैशाली वादे,प्रणीता वादे,आकांक्षा जाधव,सुनिता भुमकर,निकीता जऱ्हाड इत्यादींसह महीला व युवतींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.