बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे
बुलढाणा जिल्ह्यात अनुसुचित जातीच्या विवीध योजना रखडल्याने सदर योजनेपासुन अनुसुचित जातीतील विविध समाज या योजनेपासुन वंचित राहत आहेत .आज अनुसूचित जाती कल्याण समिती बुलडाणा जिल्ह्यात आढावा घेण्यासाठी आली असुन समिती प्रमुख आमदार प्रनितीताई सुशीलकुमार शिंदे यांना अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे मार्गदर्शक लक्ष्मणराव घुमरे,युवाप्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे व जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन विविध सामाजिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
तर महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे कर्ज प्रकरणे सुरु करण्यात येऊन निधी मंजुर करावा व दोन वर्षापासून मंजुर झालेल्या कर्जप्ररणासाठी निधी ऊपलब्ध नसल्यामुळे अनुसुचित जातीचे बेरोजगार ऊद्योग करण्यापासुन वंचित राहतात तरी मंजूर प्रकरणाला तात्काळ निधी मिळावा, जिल्हा परीषद अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास योजनेला ऊद्दीष्ट नसल्यामुळे हक्काच घर मिळणाऱ्या योजनेपासुन लाभार्थी वाट पाहत आहेत तरी रमाई आवास योजनेला १००% ऊद्दीष्ट देण्यात येऊन मंजूर रमाई घरकुल योजनेचे घरकुल चालु करण्यात यावेत,जिल्ह्यात मागासवर्गीय समाजाला ऊदा- बौद्ध मातंग व चर्मकार समाजासाठी आजही स्मशानभुमी तर नाहीच परंतु हक्काची जागा ऊपलब्ध नाही त्या मुळे अत्यंविधी करण्यासाठी खुप ञास सहन करावा लागत आहे त्या साठी शासकीय ई क्लास जमीन अत्यंसष्कार करण्यासाठी ऊपलब्ध व्हावी व सदर जमिन त्या अनुसुचित जातीची स्मशानभुमी म्हणून महसुल प्रशासनाने सातबारावर नोंद करण्यात येऊन ताब्यात द्यावी,जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मागासवर्गीयांच्या स्मशानभुमी नाहीत त्यामुळे बांधकामांसाठी निधी मंजुर करावा.
अनुसुचित जाती च्या कल्याणासाठी राबविण्यात येणारी जिल्हा परीषदेच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती विकास योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात येऊन त्या साठी निधी मंजूर करण्यात यावा
अनुसुचित जातीच्या भुमिहिन शेतकऱ्यांना मिळालेल्या भाडेपट्याची जमिनीला निकष न लावता सरसकट वर्ग १ करण्यात यावी,अनुसुचित जाती च्या विद्यार्थ्यांची शालेय फी खाजगी शाळेतील माफ करण्यात यावी व तसा आदेश शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावा,बुलडाणा जिल्ह्याला पुर्ण वेळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी नसल्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक योजनांपासून लाभार्थी वंचित आहेत,या कार्यालयात दलालांमार्फत प्रचंड प्रमाणात गैरमार्गाने पैसे जमा करून अधिकाऱ्यांचे लाड पुरविण्यात येतात तरी आपन तात्काळ पुर्ण वेळ जिल्हा समाजकल्याण अधिकारी नेमावा,येथील प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे हा अतिरिक्त प्रभार असल्यामुळे ते शक्यतोवर कार्यालयात कायम गैरहजर असतात व मर्जीतील कर्मचार्यांकडुन या कार्यालयात कामे केल्या जातात.सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या दिव्यांग प्रवर्गातील अंध,अपंग,मूकबधिर शाळेतील कर्मचार्यांची संस्थाचालकांकडुन लाखो रुपये वसूल करून पिळवणूक करण्यात येते,तर इतर ठिकाणी अतिरिक्त ठरलेले मागासवर्गीय शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्यांना या संस्थामध्ये रुजु करुन घेण्यास नकार देण्यात येतो.संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातील सर्व कर्ज वाटप प्रकिया बंद असुन चर्मकार समाजातील युवकांची उन्नती थांबविण्यात आली आहे.ईतर मागास बहुजन कल्याण विभागातील उपसंचालक जयश्रीताई सोनकवडे यांना जातीय द्वेषातून कार्य मुक्त करुन त्यांचा वरिष्ठ अधिकारी मानसिक छळ करीत आहेत तरी संबंधितांवर कडक कारवाई करावी.आदी मागण्यांचे निवेदन आमदार प्रनितीताई सुशीलकुमार शिंदे,आमदार लहुजी कानडे व अनुसूचित जाती कल्याण समितीकडे सादर करण्यात आले,सदर निवेदनावर अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवाप्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे,राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले,के.एम.वैरी,बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ डोंगरे,जिल्हा कार्याध्यक्ष इंजि.शिवाजी जोहरे,योगेश सुरडकर, अनिल बोरकर, प्रमोद माळी.यांच्यासह अनेक चर्मकार समाज बांधवांच्या सह्या आहेत.